हमरस्त्यावरील गावाला हवे बसस्थानक
By admin | Published: February 20, 2016 02:01 AM2016-02-20T02:01:09+5:302016-02-20T02:01:09+5:30
सांगोला तालुक्यातील राजकीय व व्यापारीदृष्ट्या मोठे प्रस्थ असलेले गाव म्हणून महुद गावाची ओळख आहे. गावाचे रुपडे बदलण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू असताना इथे उच्च शिक्षणासाठी तालुका, जिल्ाच्या ठिकाणी जाणार्या विद्यार्थ्यांसाठी गावातच सुविधा निर्माण व्हायला हवी अशी इथल्या तमाम जनतेची मागणी आहे. हमरस्त्यावर असलेल्या गावात बसस्थानक ही निकडीची बाब आहे. गावची प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल सुरु असल्याचे सरपंच बाळासाहेब ढाळे यांनी सांगितले.
Next
स ंगोला तालुक्यातील राजकीय व व्यापारीदृष्ट्या मोठे प्रस्थ असलेले गाव म्हणून महुद गावाची ओळख आहे. गावाचे रुपडे बदलण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू असताना इथे उच्च शिक्षणासाठी तालुका, जिल्ाच्या ठिकाणी जाणार्या विद्यार्थ्यांसाठी गावातच सुविधा निर्माण व्हायला हवी अशी इथल्या तमाम जनतेची मागणी आहे. हमरस्त्यावर असलेल्या गावात बसस्थानक ही निकडीची बाब आहे. गावची प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल सुरु असल्याचे सरपंच बाळासाहेब ढाळे यांनी सांगितले.पंढरपूरला आषाढी, कार्तिकी, माघी वारीसाठी जाणार्या सर्व दिंड्या , पालख्या याच मार्गावरुन जातात. गावाचा तीर्थक्षेत्र आराखड्यात समावेश होऊन भक्तनिवास, पालखीतळ होण्याची गरज आहे. वाहतुकीच्या दृष्टीने रस्ता रुंदीकरण झाले पाहिजे. गावातील नेतेमंडळी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार्या या गावाला शासकीय स्तरावरुन पाठबळ मिळाल्यास आदर्श गाव झाल्याशिवाय राहणार नाही. दृष्टिक्षेपात गाव...४क्षेत्रफळ : ४६६३.९, बागायत- २३४८.०५ हे., जिरायत ४९७.७८ हे.४ग्रा. पं. सदस्य : १७४कुटुंब संख्या : २६२१४दारिद्र्य रेषेखालील: ८०५४मागास कुटुंब: ४५२४शेतकरी कुटुंब: २५८२४शासकीय नोकरी: ७६०, खासगी- ५५५, व्यावसायिक- ३१०४वैयक्तिक शौचालये : १३७१,४सार्व. शौचालये: ६ युनिट४समाजमंदिर : १६४मंदिरे: २७४गावाची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल४पतसंस्था: ७४राष्ट्रीयीकृत बँक : १४प्राथ. आरोग्य केंद्र: १, उपकेंद्र १, पशुचिकित्सालय १४स्मशानभूमी १४गाव, वाड्यावस्त्यांसह १८ प्राथमिक शाळा, १७ अंगणवाड्या, ४ माध्यमिक विद्यालये,महाविद्यालय १विकासासाठी आवश्यक बाबी४पंढरपूर-मल्हारपेठ व इंदापूर -जत राज्यमार्गावरील बाजारपेठ व रहदारीचे गाव असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाची नितांत गरज. ४राष्ट्रीय पेयजल योजनेतून टंचाईग्रस्त वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा योजना राबवणे. बाजारपेठ व उद्योगाच्या दृष्टीने स्टेट बँकेची शाखा आवश्यक४तीर्थक्षेत्र विकासनिधी मंजूर होणे आवश्यक. ४पाण्याचे स्रोत भक्कम करण्यासाठी गावओढ्यावर सहा सिमेंट बंधार्यांची गरज.४वंचित वाड्यावस्त्यांना सिंगल फेज वीजपुरवठ्याची गरज४जोडरस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे. ४वाढीव गावठाणात अंतर्गत काँक्रिट रस्ते आणि भूमिगत गटारींची आवश्यकता. गावाची वैशिष्ट्ये...४ब्रिटिशकाळापासून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात खंडोबा देवस्थानची मोठी यात्रा. यात खिलार जनावरांचा मोठा बाजार भरतो. यातून मोठी उलाढाल होते.४पुरातन हेमाडपंथी मंदिरे. यात अंबिका देवीचे जागृत मंदिर आहे.४स्वच्छतेच्या दृष्टीने प्रभागात दररोज घंटागाडी आपल्या दारी हा उपक्रम राबवला जातो.४-७० टक्के हागणदारी मुक्त, ९० टक्के अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण व ८० टक्के भूमिगत गटार योजनाकोट:फोटोमोठी लोकसंख्या व बाजारपेठेचे गाव असल्याने स्मार्ट ग्रामच्या माध्यमातून निधी मिळाला तर गावाचा कायापालट होण्यास मदत होईल यासाठी शासनस्तरावरुन पुरेसा निधी मिळणे गरजेचे आहे.- शंकर मेटकरी, ग्रामविकास अधिकारीकोट/ फोटोमहुदसारख्या गावाचा सरपंच होण्याचा मान मिळाल्याचे भाग्य समजतो. स्मार्ट ग्राममध्ये आमच्या गावाचा समावेश व्हावा. त्यादृष्टीने आमचीही वाटचाल सुरु आहे. याला शासनाकडूनही पुरेसे बळ मिळावे. - बाळासाहेब ढाळे, सरपंचकोट: राजकारण हा माझा पिंड नाही; मात्र जनमताच्या जोरावर मी सदस्य झालो. उपसरपंच एक जबाबदारी मानून गावचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. - दिलीप नागणे, उपसरपंचमहुदग्रामदैवत: श्री अंबिका व श्री खंडोबालोकसंख्या: १४३५०पुरुष: ७४०४महिला: ६९४६पाण्याचा स्रोत: शिरभावी योजनेसह हातपंप व स्थानिक पाणीपुरवठा.