बस अडवून चालकाला मारहाण पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ : एमआयएमच्या तिघांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2016 12:36 AM2016-04-16T00:36:15+5:302016-04-16T00:36:15+5:30
जळगाव: चुकीच्या बसमध्ये बसलेल्या पत्नीला उतरविण्यासाठी आवाज देऊन चालकाने बस न थांबविल्याने मुराद पटेल (रा.खेडी कोरपावली, ता.यावल) या तरुणाने चालक एकनाथ शंकर पाटील (वय ५५) यांना भररस्त्यावर मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता घडला. दरम्यान, याप्रकारामुळे बस जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आली. तेथे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने वाद आणखीनच चिघळला. दरम्यान, गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने दोघांनी चूक मान्य केल्याने वाद आपसात मिटला.
Next
ज गाव: चुकीच्या बसमध्ये बसलेल्या पत्नीला उतरविण्यासाठी आवाज देऊन चालकाने बस न थांबविल्याने मुराद पटेल (रा.खेडी कोरपावली, ता.यावल) या तरुणाने चालक एकनाथ शंकर पाटील (वय ५५) यांना भररस्त्यावर मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता घडला. दरम्यान, याप्रकारामुळे बस जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आली. तेथे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने वाद आणखीनच चिघळला. दरम्यान, गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने दोघांनी चूक मान्य केल्याने वाद आपसात मिटला.मुराद पटेल व त्यांची पत्नी कोरपावली जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आले होते. पटेल हे काही मिनिटासाठी बाहेर गेले असता त्याच वेळात यावल बसची घोषणा झाली,मात्र पटेल यांच्या पत्नी त्या बसमध्ये न बसता चुकून ळगाव आगाराच्या जळगाव-भादली (क्र.एम.एच.२० डी.८३३१) बसमध्ये बसल्या. पती येण्याआधीच बस सुरू झाली,त्यांनी चालकाला बस थांबविण्यासाठी आवाज दिला, परंतु तो त्यांच्यापर्यंत पोहचला नाही. बस आगाराच्या बाहेर निघून रस्त्यावर लागली. पत्नीने बसमधूनच पतीला आवाज दिला असता पटेल यांनी रिक्षा करून बसचा पाठलाग केला. रस्त्यावरच झाला बसला आडवारिक्षाने बॅँक ऑफ महाराष्ट्रजवळ बसला ओव्हरटेक केल्यानंतर पटेल बसला आडवा झाला. चालकाने बस थांबविला असता त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. पटेल याने चालकाला शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली.त्याच वेळी भादलीहून येणार्या बसचालकाने हा प्रकार पाहिल्याने त्याने बस थांबवून हा वाद सोडविला. परंतु दोघंही आक्रमक झाल्याने बस जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आली.एमआयएमची वादग्रस्त एण्ट्रीबसचालक व पटेल यांच्यात वाद झाल्याचे समजताच एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जिया अहमद अब्दुल करीम बागवान, रेहान जहागीरदार व ऐनुद्दीन शेख यांनी पोलीस स्टेशन गाठत यात चालकाची चूक असल्याचे सांगून गोंधळ घातला. एस.टी.संघटनेच्या पदाधिकार्यांनीही धाव घेतली. यावेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने वाद आणखीनच वाढला. प्रवाशांकडून जाणून घेतली माहितीदरम्यान, पोलीस निरीक्षक श्याम तरवाडकर यांनी सर्व गर्दी बाहेर काढून बसमधील प्रवाशांकडून हकीकत जाणून घेतली. यात पटेल याने चालकाला मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी व पटेल यांनी आपसात तडजोड करुन दोघांनी चूक झाल्याचे मान्य करत आमची तक्रार नसल्याचे पोलिसांना लिहून दिले. यावेळी वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला म्हणून एमआयएमचे जिया बागवान, रेहान जहागीरदार यांना कलम१४९चीनेटीसबजावण्यातआली