आंध्र प्रदेशमध्ये बस-ट्रकची टक्कर होऊन १३ ठार

By admin | Published: October 17, 2015 10:02 AM2015-10-17T10:02:15+5:302015-10-17T10:04:04+5:30

आंध्रप्रेशमध्ये एक मिनी-ट्रक आणि बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात १३ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत.

A bus-truck collided with Andhra Pradesh and killed 13 people | आंध्र प्रदेशमध्ये बस-ट्रकची टक्कर होऊन १३ ठार

आंध्र प्रदेशमध्ये बस-ट्रकची टक्कर होऊन १३ ठार

Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १७ - आंध्रप्रेशमध्ये एक मिनी-ट्रक आणि बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात १३ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. प्रकासम जिल्ह्यातील कंडूकूरजवळ शनिवारी सकाळी हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कुंडूकूर येथून येणा-या बसची विरुद्ध दिशेने येणआ मिनी-ट्रकशी टक्कर झाली आणि ट्रकमधील १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ही टक्कर झाल्यानंतर व-हाडाच्या बसने पेट घेतला. या घटनेते १५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णलयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बसचालक आणि त्याच्या सहाय्यकाने घटनास्थळावरून पोबारा केला. 

Web Title: A bus-truck collided with Andhra Pradesh and killed 13 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.