कोलकात्यात लवकरच बायोगॅसवर चालणाऱ्या बसेस
By admin | Published: April 1, 2017 01:17 AM2017-04-01T01:17:23+5:302017-04-01T01:17:23+5:30
येत्या काही दिवसांत कोलकाताच्या रस्त्यावर बायोगॅसवर धावणा-या बसेस पाहायला मिळतील. केंद्रीय अनुदान
कोलकाता : येत्या काही दिवसांत कोलकाताच्या रस्त्यावर बायोगॅसवर धावणा-या बसेस पाहायला मिळतील. केंद्रीय अनुदान योजनेतून हे पाऊल उचलण्यात येत असून, देशात प्रथमच अशी सेवा सुरू होत आहे.
विशेष म्हणजे या बसमध्ये १७ किलोमीटर अंतरासाठी केवळ एक रुपया इतकेच भाडे असेल. प्रदूषण हा जगाला आणि भारतालाही भेडसावणारा प्रश्न बनला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमधून निघणारा धूर या प्रदूषणाचे मुख्य कारण आहे.
या प्रदूषणामुळे लोकांना मोठ्या शहरांत ही समस्या खूपच मोठी आहे.
या समस्येवर तोडगा काढत पश्चिम बंगाल सरकारने बायोगॅसवर धावणाऱ्या बसेस रस्त्यावर आणण्याची तयारी केली आहे.
पहिल्या टप्प्यात बायोगॅसवर धावणाऱ्या एकूण १२ बसेस येणार असून, त्या
१२ मार्गांवर धावणार आहेत. पहिली बस १७. ५ किलोमीटर अंतराच्या उल्टाडांगा-गरिया दरम्यान धावेल. बायोगॅसवर चालणाऱ्या बसच्या निर्मितीसाठी १८ लाख रुपये खर्च येतो.
कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या इंधनातून त्या धावतील. एक किलो बायोगॅसवर बस २0 किलोमीटर धावेत आणि तेवढ्या बायोगॅसचा खर्च केवळ ३0 रुपये असेल. वीरभूमच्या दुबराजपुरमधील बायोगॅस प्लांटमध्ये टँकरच्या साह्याने बायोगॅस कोलकातामध्ये आणला जाईल. यासाठी १0 पंप लावण्याची मंजुरी मिळाली आहे.