व्यापारी आत्महत्येप्रकरणी पत्नीची न्यायासाठी हाक
By admin | Published: December 25, 2015 11:56 PM2015-12-25T23:56:56+5:302015-12-25T23:56:56+5:30
जळगाव: येथील व्यापारी अण्णासा वामनसा क्षत्रीय यांनी धुळे व नाशिक येथील काही लोकांच्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चंद्रमल गलाणी, राजेश चंद्रमल गलाणी, गोविंदमल बटाटेवाला दलाल, कैलास रामदास पाटील (सर्व रा.धुळे) व उत्तम माणिक पाटील (रा.नाशिक ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल होवून महिना लोटला तरी अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने क्षत्रीय यांच्या पत्नी वर्षा क्षत्रीय यांनी मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांकडे न्यायासाठी साकडे घातले आहे.
Next
ज गाव: येथील व्यापारी अण्णासा वामनसा क्षत्रीय यांनी धुळे व नाशिक येथील काही लोकांच्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चंद्रमल गलाणी, राजेश चंद्रमल गलाणी, गोविंदमल बटाटेवाला दलाल, कैलास रामदास पाटील (सर्व रा.धुळे) व उत्तम माणिक पाटील (रा.नाशिक ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल होवून महिना लोटला तरी अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने क्षत्रीय यांच्या पत्नी वर्षा क्षत्रीय यांनी मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांकडे न्यायासाठी साकडे घातले आहे.बांभोरी येथील गोडावूनध्ये २६ नोव्हेंबर रोजी अण्णासा वामनसा क्षत्रीय यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर एक डिसेंबर रोजी पाच जणंाविरुध्द धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जमीनीच्या व्यवहारातून व व्याजाच्या पैशामुळे या पाचही जणांनी त्यांचा छळ केला होता असा आरोप वर्षा क्षत्रीय यांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या १७ पानी चिठ्ठीतही क्षत्रीय यांनी तसा उल्लेख आहे. व्यवहार काय,कसा व कोणासोबत झाला तसेच छळ कसा केला जात होता याची माहिती त्यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.या आरोपींना अटक झाली नाही तर नाईलाजाने उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती त्यांनी विरोधी पक्ष नेते, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही दिल्या आहेत.