योगींच्या यूपीला मुकेश अंबानींकडून ७५ हजार कोटींची 'भेट'; जिओही करणार 'धमाका'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 01:20 PM2023-02-10T13:20:32+5:302023-02-10T13:27:45+5:30
लखनौ येथे आयोजित 'यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट' मध्ये मुकेश अंबानी बोलत होते.
नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांनी पुढील चार वर्षांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीतून सुमारे १ लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच उत्तर प्रदेश ५ वर्षात १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, असा दावाही मुकेश अंबानी यांनी लखनौ येथे आयोजित 'यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट' मध्ये बोलताना केला आहे.
मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स ग्रुप राज्यात 5G सेवा, रिटेल आणि नवीन ऊर्जा व्यवसायासह टेलिकॉम नेटवर्कचा विस्तार करेल. तसेच रिलायन्स टेलिकॉम युनिट जिओ डिसेंबर २०२३पर्यंत राज्यभरात 5G सेवा सुरू करेल. जिओ उत्तर प्रदेशातील प्रत्येक शहर आणि गाव कव्हर करण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत 5Gचे रोल-आउट पूर्ण करेल, असं मुकेश अंबानी यांनी सांगितले.
Jio will complete its roll-out of 5G to cover every town and village in Uttar Pradesh by December of 2023: Mukesh Ambani, CMD, Reliance Industries at UP Global Investors Summit in Lucknow pic.twitter.com/XRxs4Nz4nA
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 10, 2023
यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट परिषद १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०२३चे उद्घाटन केले. उत्तर प्रदेश सरकारची ही प्रमुख गुंतवणूक शिखर परिषद आहे. व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी आणि भागीदारी निर्माण करण्यासाठी जगभरातील धोरणकर्ते, उद्योग नेते आणि नेत्यांना एकत्र आणणे हे शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील यावेळी उपस्थित होते.
Live: UP Global Investor Summit 2023
— ANI Digital (@ani_digital) February 10, 2023
Read @ANI Story |https://t.co/FprUs3KJF3#UttarPradesh#investorsummit#InvestorSummit2023#YogiAdityanathpic.twitter.com/sZdSzqaN0r