'बाबा, आम्हाला झोपेची औषधं द्या मग गळा दाबून मारा'; तिघांची हत्या करुन बापाने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 08:56 PM2020-02-14T20:56:40+5:302020-02-14T20:59:09+5:30

घटनास्थळावरून आत्महत्या केलेल्या नोट्स आणि औषधे इत्यादी गोष्टी पाहून असं दिसतं की संपूर्ण तयारी आणि परस्पर संमतीने कुटुंबाचा मृत्यू झाला.

Businessmen Commits Suicide With Family In Varanasi | 'बाबा, आम्हाला झोपेची औषधं द्या मग गळा दाबून मारा'; तिघांची हत्या करुन बापाने केली आत्महत्या

'बाबा, आम्हाला झोपेची औषधं द्या मग गळा दाबून मारा'; तिघांची हत्या करुन बापाने केली आत्महत्या

Next

वाराणसी -  वाराणसीत एकाच कुटुंबातील ४ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  उद्योगात झालेलं नुकसान आणि कर्जामुळे त्रस्त झालेल्या एका व्यावसायिकाने पत्नी, मुलगा आणि मुलगी यांची हत्या करुन स्वत: आत्महत्या केली आहे. मृत्यू होण्यापूर्वी व्यावसायिकाने पोलिसांना फोन करुन ही भयानक पाऊल उचलत असल्याचं कळवलं होतं. हे संपूर्ण कुटुंब 23 दिवसांपासून आत्महत्येची तयारी करत असल्याची खळबळजनक माहिती पोलिसांनी मिळाली आहे. 

वाराणसी शहरातील आदमपूर भागातील नचनी कुआं परिसरात चेतन तुळस्यान(४५) हे व्यावसायिक कुटुंबासह राहत होते. घराच्या खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर चेतनची पत्नी रितू (वय ४२), मुलगा हर्ष (१९) आणि मुलगी हिमांशी (वय १७) राहत होते. पहाटे ४.३५ वाजता चेतनने पोलिसांना फोन करुन मी कुटुंबासह आत्महत्या करत आहे असं कळवून फोन ठेऊन दिला. पोलिसांनी पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला असता कुटुंबाने कॉल घेतला नाही. अनेक अडचणीनंतर पोलिसांनी चेतन यांचे घर शोधून काढलं तेव्हा त्यांचे वडील रवींद्रनाथ यांनी दरवाजा उघडला. पोलिसांनी विचारल्यानंतर घरात सर्व काही ठीक आहे असं त्यांनी सांगितले. 
चेतनबद्दल विचारण्यास वरच्या मजल्यावर गेले असता तेव्हा खोलीचा दरवाजा उघडला नाही. पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा हर्षा आणि हिमांशी आतल्या खोलीत पलंगावर पडले होते. दुसर्‍या खोलीतील रितूचा मृतदेह पलंगावर होता आणि चेतनचा मृतदेह फासातून लटकत होता. खोलीत झोपेच्या औषधाची बाटली सापडली.

या जोडप्याच्या व दोन मुलांच्या मृत्यूची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. थोड्याच वेळात आयजी विजयसिंग मीणा, एसएसपी प्रभाकर चौधरी आणि एसपी सिटी दिनेश कुमार सिंह घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक विभागाची टीमही आली. खोलीतून पोलिसांना 12 पानांची सुसाईड नोट मिळाली. ही नोट व्यावसायिकाच्या पत्नीने लिहिली होती. 

रितूने या सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे की, २० वर्षापूर्वी जेव्हा ती लग्नानंतर वाराणसीला आली तेव्हा आनंदी कुटुंबात लग्न केल्यासारखे वाटले. त्यानंतर पतीला कमी दिसण्याचा आजार असल्याचं कळालं. कुटुंबातील सदस्यांचा ज्याप्रकारे मदत व्हायला हवी तशी झाली नाही. मुलगा आणि मुलगी यांच्यावतीने लिहिलं आहे की, पप्पा, आम्हाला झोपेच्या गोळ्या देऊन झोपवा, नंतर गळा दाबून मारा असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. 

याबाबत एसएसपी प्रभाकर चौधरी म्हणाले की, घटनास्थळावरून आत्महत्या केलेल्या नोट्स आणि औषधे इत्यादी गोष्टी पाहून असं दिसतं की संपूर्ण तयारी आणि परस्पर संमतीने कुटुंबाचा मृत्यू झाला. सुसाईड नोटसह स्टॅम्प पेपरवर लिहिलेले प्रतिज्ञापत्रही सापडले आहे. हे मागील महिन्यात 22 जानेवारी रोजी बनवण्यात आलं होतं. यावर, चेतन तुळस्यान यांनी लिहिलं होतं की त्यांच्या निधनानंतर त्यांची संपूर्ण मालमत्ता गोरखपूरमध्ये राहणाऱ्या भावंडांना द्यावी. त्यामुळे व्यापारी आणि त्याचे कुटुंबीय 23 दिवस अगोदरच आत्महत्या करण्याच्या तयारीत होतं हे प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट होतं. फॉरेन्सिक टीमने आत्महत्या नोट आणि शपथपत्रे ताब्यात घेतली आहेत.
 

Web Title: Businessmen Commits Suicide With Family In Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.