सिंहस्थ निधीतून नगरपालिकेची दोन ट्रॅक्टर ट्रॉलीची खरेदी
By admin | Published: July 29, 2015 12:42 AM2015-07-29T00:42:23+5:302015-07-29T01:21:12+5:30
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपालिकेने केलेल्या सिंहस्थ आराखड्यानुसार शासनाकडून त्र्यंबक नगरपालिकेला पहिले ३४ कोटी ६९ लाखांचा निधी मिळाला. साधू-महंतांनी केलेल्या शिफारसीनंतर तत्कालीन सत्तारुढ गटाच्या नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतर पालिकेला पुनश्च १७ कोटी रुपये वाढवून देण्यात आले. म्हणजे ५१ कोटींच्या निधीत पालिकेने गावातील विकासकामे उरकली. याच पैशात तयार करण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या आराखड्यातून त्र्यंबक नगरपालिकेने दोन ट्रॅक्टर व दोन ट्रॉली खरेदी केल्या आहे. पालिकेने सन १९९१-९२च्या सिंहस्थात एक ट्रॅक्टर आणि २००३-२००४ मध्ये एक ट्रॅक्टर घेतला होता. विशेष म्हणजे ट्रॅक्टरबरोबर दोन ट्रॉल्याही मिळाल्या होत्या. मध्यंतरी आमदार निर्मला गावित यांनी आपल्या आमदार निधीतून दोन पिकअप (महिंद्रा कंपनी) पालिकेला देऊ केले होते. सन २०१५-१६ च्या सिंहस्थ कुंभमे
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपालिकेने केलेल्या सिंहस्थ आराखड्यानुसार शासनाकडून त्र्यंबक नगरपालिकेला पहिले ३४ कोटी ६९ लाखांचा निधी मिळाला. साधू-महंतांनी केलेल्या शिफारसीनंतर तत्कालीन सत्तारुढ गटाच्या नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतर पालिकेला पुनश्च १७ कोटी रुपये वाढवून देण्यात आले. म्हणजे ५१ कोटींच्या निधीत पालिकेने गावातील विकासकामे उरकली. याच पैशात तयार करण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या आराखड्यातून त्र्यंबक नगरपालिकेने दोन ट्रॅक्टर व दोन ट्रॉली खरेदी केल्या आहे. पालिकेने सन १९९१-९२च्या सिंहस्थात एक ट्रॅक्टर आणि २००३-२००४ मध्ये एक ट्रॅक्टर घेतला होता. विशेष म्हणजे ट्रॅक्टरबरोबर दोन ट्रॉल्याही मिळाल्या होत्या. मध्यंतरी आमदार निर्मला गावित यांनी आपल्या आमदार निधीतून दोन पिकअप (महिंद्रा कंपनी) पालिकेला देऊ केले होते. सन २०१५-१६ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दोन महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर एकूण १२ लाख रुपयांना हे दोन्ही ट्रॅक्टर खरेदी केले, तर दोन ट्रॉल्यादेखील खरेदी केल्या आहेत. आज त्र्यंबक नगरपालिकेकडे सहा वाहने कचरा वाहतुकीसाठी, एक पाणीपुरवठा विभागासाठी तर अग्निशमन बंब उपलब्ध आहे; मात्र मनुष्यबळ नाही. (वार्ताहर)
-----