सहा टक्के अडतीला खरेदीदारांचा विरोध
By admin | Published: July 19, 2016 11:41 PM2016-07-19T23:41:32+5:302016-07-19T23:41:32+5:30
जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा किरकोळ व्यापारी किंवा भाजीपाला खरेदीदारांनी आपल्याकडून घेतल्या जाणार्या सहा टक्के अडत व एक टक्का बाजार शुल्काला विरोध केला. सुमारे दोन तास बाजार समितीमध्ये सौदे किंवा भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार बंद पाडण्यात आले. याचा फटका शेतकर्यांना बसला. सोमवारीही सहा टक्के अडतीच्या मुद्द्यावरून अडतदार आणि किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार यांच्यात वाद झाला होता.
Next
ज गाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा किरकोळ व्यापारी किंवा भाजीपाला खरेदीदारांनी आपल्याकडून घेतल्या जाणार्या सहा टक्के अडत व एक टक्का बाजार शुल्काला विरोध केला. सुमारे दोन तास बाजार समितीमध्ये सौदे किंवा भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार बंद पाडण्यात आले. याचा फटका शेतकर्यांना बसला. सोमवारीही सहा टक्के अडतीच्या मुद्द्यावरून अडतदार आणि किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार यांच्यात वाद झाला होता. मंगळवारी सकाळी सहा वाजताच खरेदीदारांनी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या फळ व भाजीपाला मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभे राहून खरेदीबंद आंदोलन सुरू केले. शेतकर्यांनाही किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार आपला शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेऊ देत नव्हते. काही खरेदीदारांनी तर फळ व भाजीपाला मार्केड यार्डाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. १०० ते १५० खरेदीदारांनी जोरदार घोषणाबाजी करीत सहा टक्के अडतीला विरोध केला. आम्ही शेतकर्यांकडून अडतदारांच्या मध्यस्थिशिवाय किंवा थेट खरेदी करू आणि कुठलेही शुल्क बाजार समिती, अडतदार यांना देणार नाही, अशी भूमिकाही खरेदीदारांनी घेतली. हा वाद चिघळतच होता. याच वेळी बाजार समिती प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. खरेदीदारांची समजूत काढली. सहा ऑगस्टपर्यंत अडत किती व कशी घ्यावी याबाबत स्पष्ट आदेश येतील त्यानंतर निर्णय घ्या, अशी समजूत बाजार समितीने काढली. दोन तास गोंधळ झाला. यानंतर शेवटी खरेदीदारांनी भीजापाला खरेदीला सुरुवात केली. यानंतर बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.