१०५, २५५, ५२५, विषम संख्येनं पेट्रोल खरेदी केल्यास फसवणूक टळते, वास्तव काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:30 IST2025-02-09T13:29:57+5:302025-02-09T13:30:59+5:30

Petrol Pump: पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करत असताना आपण जेवढी रक्कम देतो तेवढ्या किमतीचं पेट्रोल, डिझेल आपल्याला खरोखरच मिळतं का, याची शंका अनेक वाहनचालकांच्या मनात असते.

Buying petrol in odd numbers like 105, 255, 525, avoids fraud, what is the reality? Find out | १०५, २५५, ५२५, विषम संख्येनं पेट्रोल खरेदी केल्यास फसवणूक टळते, वास्तव काय? जाणून घ्या

१०५, २५५, ५२५, विषम संख्येनं पेट्रोल खरेदी केल्यास फसवणूक टळते, वास्तव काय? जाणून घ्या

पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करत असताना आपण जेवढी रक्कम देतो तेवढ्या किमतीचं पेट्रोल, डिझेल आपल्याला खरोखरच मिळतं का, याची शंका अनेक वाहनचालकांच्या मनात असते. बऱ्याचदा पेट्रोल पंपामधील यंत्रामध्ये तांत्रिक फेरफार करून, आकडे सेट करून ग्राहकांची फसवणूक केली जाते, असे दावे केले जात असतात. त्यामुळेच आपली फसणवूक होऊ नये म्हणून अनेकजण पेट्रोल पंपावर १००, २००, ५०० ऐवजी १०५, २०५, ५२५ अशा विषम रकमेचं पेट्रोल खरेदी करतात. अशा प्रकारे खरेदी केल्याने पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक टाळता येते, असा दावा अनेकजण करतात. असं केल्याने तांत्रिक फेरफार करून पेट्रोलपंपावर होणारी फसवणूक खरोखरच टाळता येते का? याबाबतचं वास्तव काय हे आपण जाणून घेऊयात.

एका सर्व्हेमध्ये अनेक वाहन चालकांनी सांगितले की, आमची पेट्रोल पंपावर फसवणूक झाली आहे. आम्हाला दिलेल्या रकमेपेक्षा कमी पेट्रोल मिळालं. मात्र आता विषम रकमेचं पेट्रोल खरेदी केल्याने अशी फसवणूक टाळता येऊ शकते का? असं खरोखरचं होऊ शकतं की, फसवणूक टाळण्यासाठी केवळ गैरसमजातून सुरू झालेली कृती आहे, याबाबतचं सत्य जाणून घेण्यासाठी काही बाबींसोबत माहितीवर लक्ष टाकणं आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे पेट्रोल पंपावर १००, २००, ५०० किंवा १००० साठी आधीपासून सेट कोडचा उपयोग केला जात आहे. या कोडची केवळ एक बटन दाबल्याने नोंद होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ आणि मेहनत कमी होते. मात्र यामुळे काहीतरी फेरफार होत असल्याची शंका वाहन चालकांना येते. मीटर आधीच सेट असताना आपल्याला दिलेल्या रकमेपेक्षा कमी पेट्रोल दिलं जात आहे, असं त्यांना वाटू शकतं.

मात्र खरं सांगायचं तर पेट्रोल पंपामध्ये एका फ्लो मीटर सिस्टिमचा वापर केला जातो. ही सिस्टिम पेट्रोल किंवा डिझेलची मोजणी करते. तसेच सर्व मोजणी ही लिटरच्या आधारावर होते. फ्युएल डिस्पेंसिंग मशीनमधील सॉफ्टवेअर हा लिटरला रुपयांमध्ये बदलतो. ही प्रक्रिया सेट पेट्रोल किंवा डिझेलचे दर आणि डिस्पेंस केलेल्या इंधनाचं प्रमाण यावर आधारित असते. त्यामुळे तुम्ही पेट्रोल लिटरमध्ये घेतलं किंवा रुपयांमध्ये तरीही ही सिस्टिम त्याची अचूक मोजणी करते.

वर उल्लेख केलेल्या सिस्टिममधून ग्राहक १००, ५०० किंवा १००० रुपयांचं पेट्रोल खरेदी केलं तर त्याला त्या दिवसाच्या दरानुसार आणि दिलेल्या रकमेनुसार त्या प्रमाणात इंधन मिळतं. त्यामुळे सम आकड्यांऐवजी विषम रकमेमध्ये पेट्रोल खरेदी केली तर त्यामुळे अधिक इंधन मिळण्याची कुठलीही शक्यता नसते. त्यामुळे पेट्रोल पंपावरून योग्य प्रमाणात पेट्रोल मिळवण्यासाठी वाहन मालक लिटरमध्ये इंधन मागू शकतात. तसेच त्यासाठी योग्य रक्कम देऊ शकता.  

Web Title: Buying petrol in odd numbers like 105, 255, 525, avoids fraud, what is the reality? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.