नितीशकुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याने राजद चिंतेत; नव्या समीकरणाची बिहारमध्ये चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 08:42 AM2022-10-30T08:42:45+5:302022-10-30T08:43:05+5:30

बिहारमध्ये गोपालगंज व मोकामा विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.

By-elections are being held for two assembly seats in Bihar, Gopalganj and Mokama. | नितीशकुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याने राजद चिंतेत; नव्या समीकरणाची बिहारमध्ये चर्चा?

नितीशकुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याने राजद चिंतेत; नव्या समीकरणाची बिहारमध्ये चर्चा?

googlenewsNext

- एस. पी. सिन्हा

पाटणा : बिहारमध्ये गोपालगंज व मोकामा विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार प्रचारात उतरलेले नाहीत; परंतु, आजवर जेव्हा जेव्हा त्यांची प्रकृती अस्वास्थ्य होत आली आहे, तेव्हा तेव्हा राज्याच्या राजकारणात वादळ आलेले आहे. त्यामुळे राजदची चिंता वाढली आहे.

बिहारच्या राजकीय वर्तुळात नितीशकुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची चर्चा सुरू झाली आहे. २०१७मध्ये नितीशकुमार यांची तब्येत बिघडली होती तेव्हा ते राजगीरमध्ये एक आठवडा विश्रांती घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव व त्यांचे वडील लालूप्रसाद यादव, आई राबडीदेवी यांच्या निवासस्थानी आयआरसीटीसी प्रकरणात छापेमारी करण्यात आली होती. 

काही दिवसांतच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर नितीशकुमार यांनी महागठबंधनचे सरकार पाडले होते व पुन्हा एकदा भाजपशी युती केली होती. यानंतर सरकारचे कामकाज सुरू असतानाच भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीपूर्वी नितीशकुमार कोरोना संक्रमित झाले होते. त्यावेळी बिहार दौऱ्यावर आलेले भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून चार हात लांब राहिले होते.

...तर राजदला नितीशकुमार यांची गरज उरणार नाही - 

राजकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, नितीशकुमार यांचे प्रचाराला न जाणे राजदला महाग पडू शकते. कारण, यातून संदेश जात आहे की, नितीशकुमार राजदला विजयी करू इच्छित नाहीत. त्यामुळे आता राजकारणाचीही चर्चा सुरू झाली. या पोटनिवडणुकीत भाजप व राजद प्रतिद्वंद्वी आहेत आणि यातील एक- एक जागा दोघांकडे होती. दोन्ही जागा भाजपने जिंकल्या तर नितीशकुमार यांच्या धक्क्याला फार अर्थ उरणार नाही; परंतु, राजदने दोन्ही जागा जिंकल्यास समीकरण त्या पक्षाच्या बाजूने झुकू शकते.

Web Title: By-elections are being held for two assembly seats in Bihar, Gopalganj and Mokama.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.