यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 05:24 PM2024-10-15T17:24:22+5:302024-10-15T17:55:52+5:30
Bye Elections In 47 Assembly Constituencies: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या घोषणेसोबत १५ राज्यांमधील विधानसभांच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याशिवाय लोकसभेच्या वायनाड आणि नांदेड या दोन जागांसाठीही पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या घोषणेसोबत १५ राज्यांमधील विधानसभांच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याशिवाय लोकसभेच्या वायनाड आणि नांदेड या दोन जागांसाठीही पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ९ जागांसह १४ राज्यांमधील विधानसभेत्या एकूण ४७ जागांसाठी आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर उत्तराखंडमधील केदारनाथ विधानसभा आणि नांदेड लोकसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. विधानसभेच्या आणि लोकसभेच्या सर्व पोटनिवडणुकांसाठी होणाऱ्या मतदानाचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.
Bye Elections to 47 Assembly Constituencies & 1 Parliamentary Constituency (Wayanad) in Kerala on 13th Nov
— ANI (@ANI) October 15, 2024
Bye Polls to 1 Assembly Constituency in Uttarakhand on 20th Nov
Bye Elections to 1 Parliamentary Constituency (Nanded) in Maharashtra on 20th Nov
Counting on 23rd Nov pic.twitter.com/NCxkneYL4X
उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या १० जागांसाठी निवडणूक नियोजित आहे. पैकी सीसामऊ, फुलपूर, करहल, मझवां, कटेहरी, सदर, खैर, कुंदरकी आणि मीरापूर येथीली पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर अयोध्येतील मिल्कीपूर मतदारसंघातील निवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही.
दरम्यान, ज्या १५ राज्यांमधील विधानसभेच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यामध्ये आसाममधील ५, बिहारमधील ५, चंडीगडमधील १, गुजरातमधील १, केरळमधील २, मध्य प्रदेशमधील २, मेघालयमधील १, पंजाबमधील ४, राजस्थानमधील ७, सिक्कीममधील २, उत्तर प्रदेशमधील ९, उत्तराखंडमधील १ आणि पश्चिम बंगालमधील ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
याबरोबरच केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. त्यात वायनाडमध्ये १३ नोव्हेंबर रोजी आणि नांदेडमध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघातील निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.