फुलपूर: पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांना लोकसभेत पाठवणारा मतदारसंघ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 01:57 PM2018-03-14T13:57:11+5:302018-03-14T14:12:10+5:30

भारताला पहिले पंतप्रधान देणारा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे.

UP Bye Election Results 2018 Phulpur Constituency history | फुलपूर: पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांना लोकसभेत पाठवणारा मतदारसंघ

फुलपूर: पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांना लोकसभेत पाठवणारा मतदारसंघ

Next

मुंबई- उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर येथे झालेल्या पोटनिवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. भारताला पहिले पंतप्रधान देणारा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. आज केशवप्रसाद मौर्य यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. अनेक फुलपूरची ओळख अनेक पोटनिवडणुकांना सामोरे जाणार मतदारसंघ अशीही आहे.

1952 साली पहिल्या लोकसभेत पं. जवाहरलाल नेहरु यांनी याच मतदारसंघातून प्रवेश केला होता. त्यानंतर 1957 आणि 1962 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही पं. नेहरु याच मतदारसंघातून विजयी झाले होते. १९६४ साली पं. जवाहरलाल नेहरु यांचे निधन झालेल्या पोटनिवडणुकीत विजयालक्ष्मी पंडित विजयी झाल्या. त्यानंतर 1967 साली त्या पुन्ही विजयी झाल्या. 1969 साली पुन्हा पोटनिवडणुकीत संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावर जनेश्वर मिश्रा विजयी झाले. 

1971 साली व्ही. पी. सिंग काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत गेले. प्रथमच लोकसभेत जाणाऱ्या व्ही. पी. सिंग यांना वाणिज्य मंत्रालयाचे उपमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 1976 साली त्यांच्याकडे मंत्रालयाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आली. 1980 साली ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तर 1989-90 या एका वर्षाच्या काळासाठी ते भारताचे पंतप्रधान होते. 1977 साली भारतीय लोकदलाच्या तिकिटावर कमला बहुगुणा यांना फुलपूरच्या खासदार झाल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या त्या पत्नी होत्या. 1980 साली झालेल्या निवडणुकीमध्ये जनता दलाचे बी. डी. सिंग यांनी विजय मिळवला. त्यानंतर 1996 आणि 1998 असे सलग दोनदा समाजवादी पार्टीचे जंग बहादूर पटेल विजयी झाले. त्यानंतर 1999 साली समाजवादी पक्षाचे धर्मराज पटेल आणि 2004 साली अतिक अहमद यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्तव करण्याची संधी मिळाली. 2009 साली येथून कपिलमुनी करवारिया हे बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत गेले आणि 2014 साली पहिल्यांदाच भाजपाला केशव प्रसाद मौर्य यांच्या निमित्ताने ही जागा आपल्याकडे घेता आली. उत्तर प्रदेशातील बहुतांश सगळ्या महत्त्वाच्या पक्षांना या मतदारसंघाने आजवर एकदा तरी संधी दिली आहे. पंतप्रधान, पंतप्रधानांची बहिण, भावी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची पत्नी, भावी उपमुख्यमंत्री यांना लोकसभेत पाठवणारा हा एकमेवाद्वितीय मतदारसंघ असावा.

Web Title: UP Bye Election Results 2018 Phulpur Constituency history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.