Bypoll Results: देशातील १४ पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला 'अच्छे दिन', भाजपाचं 'कमळ' कोमेजलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 12:08 PM2018-05-31T12:08:16+5:302018-05-31T18:37:42+5:30
देशभरातल्या १४ मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालातून राजकीय पक्षांना आपण किती पाण्यात आणि किती खोलात आहोत, हे कळणार आहे.
नवी दिल्लीः लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झालेत. त्यापैकी पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं असलं, तरी इतर मतदारसंघातील लढतींवरूनही भाजपा आणि काँग्रेसच्या ताकदीचा अंदाज बांधला जाणार आहे. स्वाभाविकच, राजकीय जाणकारांचं लक्ष १४ जागांवर आहे.
महाराष्ट्रातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांच्याविरोधात कुणीच उमेदवार न दिल्यानं या मतदारसंघात मतदान झालं नव्हतं. विश्वजीत कदम बिनविरोध विजयी झालेत. ही जागा वगळता, इतर १४ ठिकाणी काय चित्र आहे, यावर एक दृष्टिक्षेप...
लोकसभा पोटनिवडणूक निकाल
कैराना - राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सूम हसन विजयी. मृगांका सिंह यांचा केला पराभव. काँग्रेस-सपा-बसपा-रालोद एकीने मोदी-शहा-योगी त्रिकुटाला मोठा धक्का.
पालघर - भाजपाचे उमेदवारी राजेंद्र गावित विजयी. शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा दुसऱ्या स्थानावर (जाणून घ्या अपडेट्स)
भंडारा-गोंदिया - राष्ट्रवादी काँग्रेस मधुकर कुकडे यांची विजयी घोडदौड कायम, भाजपाचे हेमंत पटले पिछाडीवर. (जाणून घ्या अपडेट्स)
नागालँड - नागालँड विधानसभेतील सत्ताधारी नागा पीपल्स फ्रंट आघाडीवर.
विधानसभा पोटनिवडणूक निकाल
नूरपूर (उत्तर प्रदेश) - समाजवादी पार्टी विजयी
शाहकोट (पंजाब) - काँग्रेस विजयी
जोकीहाट (बिहार) - राष्ट्रीय जनता दल विजयी
गोमिया (झारखंड) - झारखंड मुक्ती मोर्चा विजयी
सिल्ली (झारखंड) - झारखंड मुक्ती मोर्चा विजयी
चेनगन्नूर (केरळ) - माकपा विजयी
राजराजेश्वरी नगर (कर्नाटक) - काँग्रेस विजयी
अम्पाती (मेघालय) - काँग्रेस विजयी
थराली (उत्तराखंड) - भाजपा विजयी
महेशताला (पश्चिम बंगाल) - तृणमूल काँग्रेस विजयी