सात राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार, निवडणूक आयोगाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 01:16 PM2024-06-10T13:16:07+5:302024-06-10T13:17:01+5:30

सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने सात राज्यातील १३ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक घेण्याची घोषणा केली आहे.

Bypolls in 13 assembly seats across 7 states on July 10, announces Election Commission | सात राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार, निवडणूक आयोगाची घोषणा

सात राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार, निवडणूक आयोगाची घोषणा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर आता देशातील ७ राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने सात राज्यातील १३ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक घेण्याची घोषणा केली आहे. या पोटनिवडणुकसाठी १० जुलैला मतदान होणार असून १३ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. 

बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात विधानसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, ज्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत, त्या जागांसाठी अधिसूचना १४ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ जून असणार आहे. तर २४ जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २६ जून असणार आहे. दरम्यान, १० जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत बिहारमधील एका विधानसभेच्या जागेवर, पश्चिम बंगालमधील ४ जागांसाठी, तामिळनाडूतील १, मध्य प्रदेशातील १, उत्तराखंडमधील २, पंजाबमधील १ आणि हिमाचलमधील ३ जागांसाठी मतदान होणार आहे.

'या' जागांवर होणार पोटनिवडणूक

पश्चिम बंगाल 
१) माणिकतला
२) राणाघाट दक्षिण
३) बागडा
४) रायगंज

बिहार
१) रुपौली

तामिळनाडू
१) विक्रावंदी

हिमाचल प्रदेश
१) देहरा
२) हमीरपुर
३) नालागड

उत्तराखंड
१) बद्रीनाथ 
२) मंगलोर
 
पंजाब
१) जालंधर पश्चिम

मध्य प्रदेश
१) अमरवाडा

Web Title: Bypolls in 13 assembly seats across 7 states on July 10, announces Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.