नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरसह देशभरात 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 09:39 PM2024-08-02T21:39:36+5:302024-08-02T21:40:54+5:30

देशभरात ₹50000 कोटींचे 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर बांधले जाणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

Cabinet Decision: 8 National High-Speed Road Corridors to be constructed at a cost of ₹50000 crore; Cabinet decision | नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरसह देशभरात 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी

नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरसह देशभरात 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी

Cabinet Decision : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Decision) देशातील पायाभूत सुविधां वाढवण्याच्या दिशेने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने एकूण 50,000+ कोटी रुपयांच्या 936 किमी लांबीच्या 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, मंत्रिमंडळाने आज (2 ऑगस्ट 2024) 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वपूर्ण राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमुळे देशभरातील लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारणे, गर्दी कमी करणे आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यात मदत होईल.

आठ हायस्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्प
6 लेन आग्रा-ग्वाल्हेर नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉर
4 लेन खारापूर-मोरेग्राम राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर
6  लेन थरड-दिशा-मेहसाणा-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर
4 लेन अयोध्या रिंग रोड
4 लेन पाथळगाव आणि गुमला रायपूर-रांची नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉर
6 लेन कानपूर रिंग रोड
4 लेन उत्तर गुवाहाटी बायपास आणि सध्याच्या गुवाहाटी बायपासचे रुंदीकरण
पुण्याजवळ 8 लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा-खेड कॉरिडॉर

या हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांचे फायदे
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, 6 लेनच्या आग्रा-ग्वाल्हेर नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉरच्या बांधकामामुळे आग्रा ते ग्वाल्हेर दरम्यानचा प्रवासाचा वेळ 50 टक्क्यांनी कमी होईल. कानपूर-मृग्राम कॉरिडॉर पश्चिम बंगाल आणि ईशान्येच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट करेल. कानपूर रिंगरोडमुळे कानपूरच्या आसपासच्या हायवे नेटवर्कमधील गर्दी कमी होईल. रायपूर-रांची कॉरिडॉर पूर्ण झाल्यास झारखंड आणि छत्तीसगडच्या विकासाचा मार्ग खुला होईल. गुजरातमध्ये अखंड बंदर जोडणीसाठी हायस्पीड रोड नेटवर्कचे बांधकाम आणि लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी थरड आणि अहमदाबाद दरम्यान नवीन कॉरिडॉर पूर्ण केले जाईल.

Web Title: Cabinet Decision: 8 National High-Speed Road Corridors to be constructed at a cost of ₹50000 crore; Cabinet decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.