मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयही लीक, पंतप्रधान कार्यालयाकडून गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:15 AM2018-03-30T04:15:51+5:302018-03-30T04:15:51+5:30

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती अधिकृतरीत्या घोषित करण्याआधीच

Cabinet meeting decisions also leak, serious interference from Prime Minister's Office | मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयही लीक, पंतप्रधान कार्यालयाकडून गंभीर दखल

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयही लीक, पंतप्रधान कार्यालयाकडून गंभीर दखल

Next

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती अधिकृतरीत्या घोषित करण्याआधीच प्रसार माध्यमांच्या हाती पडल्याचा प्रकार पंतप्रधान कार्यालयाने गांभीर्याने घेतल्यानंतर या घरभेदी प्रकारामागे कोण आहेत, याचा छडा लावण्यासाठी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) ते पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत ईशान्य भारताचा विकासासाठी अनुदान, कृषी विज्ञान केंद्र सशक्त करणे आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारच्या पीएफ योगदानासंबंधीचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन एकाच वेळी प्रसार माध्यमांना देण्याचे ठरले. तथापि, बुधवारी सायंकाळीच काही बातम्या प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचल्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या माध्यमातून सकारात्मक संदेश लोकांपर्यंत जावा म्हणून गुरुवारी सुटी असताना पत्रकार परिषद घेऊन निर्णयाबाबत माहिती देण्याचे ठरविण्यात आले.
तत्पूर्वी, संबंधित खात्याच्या मंत्र्यांमार्फत प्रसार माध्यमांना मुख्य मुद्यांबाबत माहिती देण्याचे ठरविण्यात आले; परंतु त्यानंतर असे ठरले की, निवडणुकीच्या दृष्टीने हे सर्व निर्णय महत्त्वपूर्ण असल्याने एकाच वेळी ही माहिती प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सूत्रांन’ी सांगितले;
परंतु यादरम्यान असे कळले की, सरकार ज्या प्रमुख मुद्यांची माहिती प्रसार माध्यमांना देणार होते, त्यातील काही माहिती प्रसार माध्यमांच्या हाती पडली होती. त्यानंतर पीआयबीचे भावी महासंचालक सितांशू कार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाºयांना विचारणा करण्यात आली. कार्मिक मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, सितांशू कार किंवा पीआयबीच्या अधिकाºयांकडून ही माहिती फुटलेली नाही. पंतप्रधान कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाच्या सल्ल्यानुसार ही माहिती काही लोकांना देण्यात आली. त्यानंतर ही माहिती कळलेल्या लोकांना हे वृत्त रोखण्याची विनंती करण्यात आली.

Web Title: Cabinet meeting decisions also leak, serious interference from Prime Minister's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.