जयललितांच्या फोटोसमोर पार पडली कॅबिनेट बैठक
By admin | Published: October 19, 2016 04:55 PM2016-10-19T16:55:20+5:302016-10-19T16:55:20+5:30
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची उणीव भासू नये तसंच त्यांच्या अनुपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत असल्याने त्यांचा फोटो समोर ठेवण्यात आला होता
Next
>
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 19 - तामिळनाडू राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री जयललिता यांची तब्बेत खराब असल्याने अर्थमंत्री पनिरसेल्वम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मात्र जयललिता यांची उणीव भासू नये तसंच त्यांच्या अनुपस्थितीत बैठक पार पडत असल्याने त्यांचा फोटो समोर ठेवण्यात आला होता.
'तब्बल एक तास ही बैठक चालू होती. सकाळी 9.30 वाजता सुरु झालेली बैठक 10.30 वाजेपर्यंत चालू होती. बैठकीदरम्यान पनीरसेल्वम यांच्यासमोर जयललिता यांचा मोठा फोटो समोर ठेवण्यात आला होता', अशी माहिती सचिवालयामधील अधिका-याने दिली आहे.
या बैठकीत मुख्यत: कावेरी पाण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. अण्णाद्रुमूक सत्तेत आल्यापासून मंत्रिमंडळाची पार पडलेली ही तिसरी बैठक होती. 23 जुलै रोजी जयललिता यांचा शपथविधी पार पडल्यानंतर पहिली बैठक झाली होती. त्यानंतर राज्य अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी जुलैमध्ये दुसरी बैठक झाली होती.
सचिवालयात सुरू असलेल्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री जयललिता यांची कमतरता भासू नये यासाठी त्यांचा फोटो समोर ठेवून बैठका घेतल्या जात आहेत. बैठकीच्या वेळी समोर फोटो असावा याची खास काळजी मंत्री घेत आहेत. जयललिता यांच्या अनुपस्थितीतही राज्याचा कारभार त्यांच्या डोळ्यांसमोर चालू राहावा यासाठी ही सगळी कसरत केली जात आहे. राज्य सरकारच्या माहिती विभागाकडून बैठकांसाठी फोटो जारी केला जात आहे. इतकंच नाही तर फोटोखाली 'सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होत आहे' असं लिहिलं जात आहे. मात्र आजारी जयललिता यांनी हे आदेश कसे दिले याबाबत अधिका-यांनी खुलासा केलेला नाही.
जयललिता यांच्या दीर्घकाळच्या इस्पितळातील वास्तव्यामुळे तमिळनाडू राज्याच्या प्रशासनात निर्माण झालेली अस्थिरता दूर करण्याचा तात्पुरता उपाय म्हणून जयललिता यांच्या सल्ल्यावरून त्यांच्याकडील सर्व खाती ओ. पनिरसेल्वम यांच्याकडे सोपविली आहेत. मुख्यमंत्रीपदी जयललिताच कायम असल्या तरी मंत्रिमंडळ बैठक मात्र पनिरसेल्वम यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे राजभवनाच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले होते.
जयललिता (६८) यांना ताप आणि निर्जलीकरणामुळे २२ सप्टेंबर रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून तज्ज्ञांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे,