Cabinet Meeting: सोलर पीव्ही, सेमीकंडक्टर ते लॉजिस्टिक; केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत 3 मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 04:55 PM2022-09-21T16:55:47+5:302022-09-21T16:56:17+5:30

Cabinet Decision: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

Cabinet Meeting: Solar PV, Semiconductor to Logistics; 3 major decisions in the Union Cabinet meeting | Cabinet Meeting: सोलर पीव्ही, सेमीकंडक्टर ते लॉजिस्टिक; केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत 3 मोठे निर्णय

Cabinet Meeting: सोलर पीव्ही, सेमीकंडक्टर ते लॉजिस्टिक; केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत 3 मोठे निर्णय

googlenewsNext

Cabinet Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची (cabinet meeting) बैठक पार पडली. या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी 3 निर्णय घेण्यात आले. यामध्ये- 1)सोलर पीव्हीसाठी पीएलआय योजनेचा विस्तार करणे, 2)सेमीकंडक्टर उत्पादनाच्या तीन योजनांमध्ये 50 टक्के सवलत देणे आणि 3) राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणालाही मंजुरी दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (anurag thakur) म्हणाले की, सरकारने सौर पीव्ही मॉड्यूल ट्रान्स-2 साठी पीएलआय योजनेला मान्यता दिली आहे. त्यासाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशात सौर पॅनेल निर्मितीला चालना मिळणार आहे.

सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमच्या विकासासाठी मंत्रिमंडळाने सुधारणांना मंजुरी दिली आहे. तंत्रज्ञान नोड्स तसेच कंपाऊंड सेमीकंडक्टर, पॅकेजिंग आणि इतर सेमीकंडक्टर सुविधांसाठी 50% प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे 2 लाख लोकांना प्रत्यक्ष आणि 8 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.

Web Title: Cabinet Meeting: Solar PV, Semiconductor to Logistics; 3 major decisions in the Union Cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.