नव्या रुग्णवाहिकेच्या उद्घाटनाला गेले कॅबिनेट मंत्री; प्रत्यक्षात दिसली खटारा रुग्णवाहिका, अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 09:31 AM2021-05-21T09:31:49+5:302021-05-21T09:32:21+5:30

नव्या रुग्णवाहिकेऐवजी प्रशासनाला उभी केली खटारा रुग्णवाहिका; कॅबिनेट मंत्र्यांची त्यांच्याच मतदारसंघात फजिती

cabinet minister went to inaugurate new ambulance found old ambulance on the spot | नव्या रुग्णवाहिकेच्या उद्घाटनाला गेले कॅबिनेट मंत्री; प्रत्यक्षात दिसली खटारा रुग्णवाहिका, अन् मग...

नव्या रुग्णवाहिकेच्या उद्घाटनाला गेले कॅबिनेट मंत्री; प्रत्यक्षात दिसली खटारा रुग्णवाहिका, अन् मग...

googlenewsNext

हरसूद: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र ही लाट पूर्णपणे ओसरलेली नाही. याशिवाय तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था उत्तम राखणं गरजेचं आहे. मात्र अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रेणचा बोजवारा उडाला आहे. त्याचं विदारक चित्र मध्य प्रदेशच्या हरसूलदमध्ये दिसून आलं.

पंतप्रधान मोदींनी स्वत:चाच शब्द फिरवला; यू टर्नमुळे कोरोना संकट आणखी वाढण्याचा धोका

मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शहा यांनी प्रशासनाला नव्या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्याचे आदेश दिले. मंत्र्यांच्या आदेशानंतर हरसूदमधील प्रशासन कामाला लागलं. रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यासाठी शहा यांनाच बोलावण्यात आलं. उद्धाटनाला पोहोचताच शहा प्रचंड संतापले. प्रशासनानं नव्या रुग्णवाहिकेऐवजी जुनी रुग्णवाहिका आणून ठेवली होती. त्यांनी रागाला कसाबसा आवर घातला आणि रुग्णवाहिका सुरू करण्यास सांगितली. मात्र बऱ्याच प्रयत्नांनंतरही ती सुरूच होईना. त्यामुळे मग मंत्र्यांनी रुग्णवाहिकेला धक्का देण्यास सांगितलं. मात्र बराच वेळ धक्का दिल्यावरही ती सुरू झाली नाही.

कोरोनाच्या संकटात मोठा निष्काळजीपणा! देशातील 50 टक्के लोक मास्कच वापरत नाहीत; रिसर्चमधून खुलासा

रुग्णवाहिका सुरूच न झाल्यानं मंत्र्यांची फजिती झाली. विशेष म्हणजे हरसूद मंत्री विजय शहा यांचाच मतदारसंघ आहे. स्वत:च्याच मतदारसंघात उद्घाटनादरम्यान फजिती झाल्यानं संतापलेल्या शहांनी आरोग्य विभागाचे सीएमएचओ डॉ डी.एस.चौहान यांना फैलावर घेतलं. 'हरसूद आणि खालवासाठी नवी रुग्णवाहिका खरेदी करण्याचे आदेश दिले होते. मग नवी रुग्णवाहिका कुठे आहे?,' असा सवाल शहांनी विचारला. शहांचा रुद्रावतार पाहून अधिकारीही भांबावून गेले. नुसत्या फिती कापून काही होणार नाही. तुम्ही आणलेली रुग्णवाहिका इतकी खटारा होती की ती सुरूदेखील झाली नाही, असं शहांनी सुनावलं आणि ते निघून गेले.

Web Title: cabinet minister went to inaugurate new ambulance found old ambulance on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.