रेल्वेच्या सिग्नल पॅनलवर तब्बल ६ फूट लांब काेब्रा फणा काढून बसला; २० मिनिटांचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 07:47 AM2022-06-03T07:47:50+5:302022-06-03T07:47:55+5:30

स्टेशन मास्तरांच्या केबिनमध्ये असलेल्या सिग्नल पॅनलवर तब्बल ६ फूट लांब काेब्रा फणा काढून बसला हाेता.

Cabra sitting on the signal panel of the train; 20 minutes of vibration | रेल्वेच्या सिग्नल पॅनलवर तब्बल ६ फूट लांब काेब्रा फणा काढून बसला; २० मिनिटांचा थरार

रेल्वेच्या सिग्नल पॅनलवर तब्बल ६ फूट लांब काेब्रा फणा काढून बसला; २० मिनिटांचा थरार

Next

काेटा : साप पाहिला की भल्याभल्यांची बाेबडी वळते. त्यात सर्वात विषारी सापांपैकी एक असलेला काेब्रा म्हटलं की दरदरून घामच फुटताे. हा काेब्रा रेल्वे स्थानकावरील सिग्नल पॅनलवर बसायची आणि धड... धड करत जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसची वेळ एकच आली तर?  राजस्थानच्या काेटा शहरजवळच्या रावथा राेड रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला.

स्टेशन मास्तरांच्या केबिनमध्ये असलेल्या सिग्नल पॅनलवर तब्बल ६ फूट लांब काेब्रा फणा काढून बसला हाेता. हे चित्र पाहताच त्यावेळी ड्यूटीवर असलेले कर्मचारी घाबरून दूर टेबलवर जाऊन बसले. काेब्रा पॅनलवर बसला हाेता, त्याचवेळी राजधानी एक्स्प्रेस तेथून गेली. स्टेशन मास्तर केदार प्रसाद मीणा यांनी काेटा येथील कंट्राेलरला याबाबत माहिती दिली.

स्टेशन मास्तरांच्या केबिनमध्ये काेब्रा आल्याची माहिती मिळताच पाॅइंटमन ललित बैरासी हे तत्काळ त्यांच्या केबिनमध्ये पाेहाेचले. बाका प्रसंग पाहून त्यांनी स्वत:चा जीव धाेक्यात घालून सिग्नल पॅनलवर बसलेल्या कोब्राला पकडून जंगलात साेडले.  त्यानंतर मीणा यांनी सिग्नल पॅनलचा ताबा घेतला आणि गाड्या नियंत्रित केल्या.  (वृत्तसंस्था)

२० मिनिटांचा थरार

सिग्नल उपकरणात चुकून साप घुसला तर गाड्या चालवण्यात अडचणी येऊ शकतात. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी अनेक प्रवासी आणि मालगाड्या एका मागे धावत होत्या. त्यामुळे काेब्राला तेथून हटविणे गरजेचे हाेते, असे स्टेशन मास्तर मीणा यांनी सांगितले. काेब्रा सुमारे २० मिनिटे पॅनलवर विराजमान हाेता; पण त्यामुळे शेकडाे प्रवाशांचे जीव धाेक्यात गेले असते.
 

Web Title: Cabra sitting on the signal panel of the train; 20 minutes of vibration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे