आधीपेक्षा जास्त दारू पिऊ लागल्या दिल्लीतील महिला, सर्वेक्षणातून धक्कादायक टक्केवारी उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 04:15 PM2022-11-08T16:15:28+5:302022-11-08T16:45:40+5:30

दारु पिणे म्हणजे आता ट्रेंड असल्यासारखे झाले आहे. अगदी लहान वयोगटातील मुलेही दारुच्या आहारी गेले आहेत. दारुचे सेवन करण्यात भारताची राजधानी तर सर्वात पुढे आहे.

cadd-survey-says-alcohol-consumption-in-delhi-women-have-increased-compared-to-early-years | आधीपेक्षा जास्त दारू पिऊ लागल्या दिल्लीतील महिला, सर्वेक्षणातून धक्कादायक टक्केवारी उघड

आधीपेक्षा जास्त दारू पिऊ लागल्या दिल्लीतील महिला, सर्वेक्षणातून धक्कादायक टक्केवारी उघड

Next

दारु पिणे म्हणजे आता ट्रेंड असल्यासारखे झाले आहे. अगदी लहान वयोगटातील मुलेही दारुच्या आहारी गेले आहेत. दारुचे सेवन करण्यात भारताची राजधानी तर सर्वात पुढे आहे. दिवाळीपुर्वी तीन दिवसात दिल्लीत १०० कोटींची दारु विकली गेली. आताही एक नवीन सर्वेक्षण समोर आले आहे ज्यामध्ये दिल्लीतील महिलाही दारु पिण्यात पुढे असल्याचे दिसून आले याहे. यामागे कारण आहे ते एकावर एक मोफत मिळणाऱ्या दारुचे. अनेक रेस्टॉरंट्स, बार मध्ये ड्रिंक्सवर ऑफर दिली जाते. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी महिलाही काही मागे नाहीत हे सर्वेक्षणातून दिसते. तसेच दारु मिळणे आता सहज शक्य झाले आहे, आता तर ऑनलाईनही दारु खरेदी करता येते. 

५ हजार महिलांचे सर्वेक्षण

वेगवेगळ्या वयोगटानुसार ५ हजार महिला या सर्वेक्षणात सहभागी झाल्या होत्या. १८ ते ३० वयोगतातील १४५३ महिलांनी दारुचे सेवन केले. ३१ ते ४५ वयोगटातील २०२१, ४६ ते ६० वयोगटातील १२०६ आणि ६० वर्षे पेक्षा जास्त वयोगटातील ३२ महिलांनी दारु प्यायल्याचे निदर्शनास आले.

कोणत्या महिलांमध्ये दारुची सवय वाढली ?

ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान हे सर्वेक्षण केले गेले. या ५ हजार महिलांमध्ये ८९ टक्के म्हणजे ४४८० महिला स्वत: कमावतात. विशेष म्हणजे यापैकी ३७ टक्के महिलांनी हे मान्य केले की त्यांची दारु पिण्याची सवय वाढली आहे. या महिलांमध्ये एक गट असा होता ज्यांचा पगार चांगला आहे, अनेकांची मुले लहान आहेत. तर काही महिला या नैराश्यामुळेही दारु पिताना दिसल्या. 

या कारणामुळे वाढले दारुचे सेवन

४५ टक्के केसमध्ये तणाव हेच दारु पिण्याचे कारण दिसले.
३४ टक्के महिला सांगतात की, कोरोनानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी दारुची मदत घेतली.
कंटाळा आला म्हणून दारु घेतली अशीही काही महिलांची कारणे आहेत.
अनेक महिलांनी हे मान्य केले की समाजात आपण मागे राहू नये म्हणून दारु प्यायला सुरुवात केली.

दिल्लीमध्ये ६२ टक्के महिलांचा दारुवरील खर्च वाढला आहे. वाईन च्या विक्रीत ८७ टक्के, व्हिस्की मध्ये ५९.५ टक्के आणि बीयर च्या विक्रीत ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे

Web Title: cadd-survey-says-alcohol-consumption-in-delhi-women-have-increased-compared-to-early-years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :delhiदिल्ली