राज्य सरकारांना ज्याची धास्ती त्या कॅगमध्ये 10811 पदांवर जंबो भरती; परीक्षा नाही, थेट नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 12:30 PM2021-02-03T12:30:15+5:302021-02-03T12:31:12+5:30

CAG Recruitment 2021 साठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन नीट वाचावे. यानंतर अर्ज डाऊनलोड करावा. काळजीपूर्वक अर्ज भरावा.

CAG Recruitment 2021: 10811 posts in the CAG; No exam, direct appointment | राज्य सरकारांना ज्याची धास्ती त्या कॅगमध्ये 10811 पदांवर जंबो भरती; परीक्षा नाही, थेट नियुक्ती

राज्य सरकारांना ज्याची धास्ती त्या कॅगमध्ये 10811 पदांवर जंबो भरती; परीक्षा नाही, थेट नियुक्ती

googlenewsNext

CAG Recruitment 2021 : कोरोन काळात आणि पश्चात सरकारी नोकऱ्यांचा पाऊस पडू लागला आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्य शोधात असाल आणि पात्र असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. भारताचे महालेखापाल म्हणून ज्या संस्थेची धास्ती साऱ्या राज्य सरकारांना असते त्या कॅगमध्ये (CAG Recruitment 2021) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 


कॅगमध्ये 10811 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी योग्य आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अधिकृत नोटीस cag.gov.in वर जाऊन पाहता येणार आहे. किंवा थेट लिंक खाली देण्यात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार 6409 जागा लेखा परीक्षक आणि 4402 पदे लेखापाल म्हणून भरण्यात येणार आहेत. उमेदवार या पदांसाठी 19 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. 

नोकरी विषयक अन्य बातम्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा...


अर्ज कसा कराल....
CAG Recruitment 2021 साठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन नीट वाचावे. यानंतर अर्ज डाऊनलोड करावा. काळजीपूर्वक अर्ज भरावा. यानंतर हा अर्ज स्पीड पोस्टाने “Shri V S Venkatanathan, Asstt. C &AG (N), O/o the C&AG of India, 9, Deen Dayal Upadhyay Marg, New Delhi- 110124.” या पत्त्य़ावर पाठवावा लागणार आहे. 


CAG Recruitment 2021 साठी शिक्षणाची अट...
या पदांसाठी कोणत्य़ाी मान्यतप्राप्त बोर्ड,  विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी असणे बंधनकारक आहे. 

वयाची अट...
CAG Recruitment 2021 साठी वयाची अट 18 ते 27 वर्षे ठेवण्यात आली आहे. याचबरोबर वेगवेगळ्या आरक्षणानुसार वयात सूट दिली जाणार आहे. 

पगार
दोन्ही पदांसाठी पगार 29200-92300 हजार प्रतिमहिना असणार आहे. तसेच थेट नियुक्ती केली जाणार आहे. तुमच्या योग्यतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. 

नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

अर्ज करण्याआधी ही लिंक जरूर पहा...क्लिक करा...

 

BARC Recruitment 2021: भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये नर्स, चालकांसह अन्य जागांसाठी भरती; १२ वी पास उमेदवारांनाही संधी

Bhabha Atomic Research Centre (BARC) Recruitment 2021: भाभा अणुशक्ती संशोधन केंदामध्ये (BARC) नर्स, चालक आणि ट्रेनी व इतर जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांकडून १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज ही मागविण्यात आले आहेत. 

भाभा अणुशक्ती केंद्राने नुकतेच पात्र उमेदवारांकडून विविध जागांसाठी अर्ज मागविले आहेत. एकूण 63 जागा आहेत. या पदांसाठी अनेकजण इच्छुक असून त्यांनी अर्ज भरण्यासही सुरुवात केली आहे. २१ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 
मुंबईमध्ये ही भरती केली जाणार असून यासाठी 12 वी, पदवीधारक अर्ज करू शकणार आहेत. 

 

Web Title: CAG Recruitment 2021: 10811 posts in the CAG; No exam, direct appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.