चीनची पुन्हा युद्धाची भाषा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:15 AM2017-07-31T02:15:49+5:302017-07-31T02:15:58+5:30

भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती असताना चीनकडून सातत्याने युद्धाची भाषा बोलली जात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही चीनच्या सैन्यात सर्व शत्रूंना मात देण्याची क्षमता असल्याचे म्हटले

cainacai-paunahaa-yaudadhaacai-bhaasaa | चीनची पुन्हा युद्धाची भाषा!

चीनची पुन्हा युद्धाची भाषा!

Next

बीजिंग : भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती असताना चीनकडून सातत्याने युद्धाची भाषा बोलली जात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही चीनच्या सैन्यात सर्व शत्रूंना मात देण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. एका अर्थाने भारताला ही चेतावनी असल्याचे मानले जात आहे.
पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ९० व्या स्थापना दिवसानिमित्त मंगोलियात झालेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या लष्करी संचलनानंतर ते बोलत होते. सैन्याच्या ड्रेस परिधान केलेल्या शी जिनपिंग यांनी खुल्या जीपमधून आशियातील सर्वात मोठे सैन्य प्रशिक्षण केंद्र झुरिहे येथे १२ हजार सैन्याच्या परेडचे निरीक्षण केले. चीनच्या मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १०० पेक्षा अधिक लढाऊ विमानांनी यावेळी उड्डाण केले. यावेळी ६०० प्रकारच्या हत्यारांचे प्रदर्शन करण्यात आले. सैनिकांना संबोधित करताना शी जिनपिंग म्हणाले की, मला विश्वास आहे की, आमच्या सैन्यात सर्व शत्रूंना मात देण्याची क्षमता आणि साहस आहे. तथापि, डोकलामवरून भारत आणि चीन यांच्यात सुरूअसलेल्या तणावाचा त्यांच्या भाषणात कुठे उल्लेख आला नाही.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे प्रशिक्षण पूर्वनियोजित होते. आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात शी जिनपिंग म्हणाले की, आमचे सैन्य एका मजबूत सैन्याच्या निर्मितीत नवा अध्याय लिहिण्यासाठी तयार आहे. विश्व शांती आणि सुरक्षा यात योगदान देण्यासाठी सैन्य तयार आहे. या कार्यक्रमाचे सरकारी टीव्ही आणि रेडिओवर प्रसारण करण्यात आले. भारतीय सीमेजवळ चीनने अलीकडेच ज्या रणगाड्यांचा सराव केला होता त्या रणगाड्यांचा आज संचलनात सहभाग करण्यात आला होता. अमेरिकी सैन्यानंतर चीनच्या सैन्याचा जगात दुसरा क्रमांक आहे. त्यांचे संरक्षण बजेट १५२ अमेरिकी डॉलर आहे. पीएलएची स्थापना १९२७ मध्ये झालेली आहे. (वृत्तसंस्था)
१२००० जवान, १२९ विमाने -
या संचलनात १२ हजार जवानांनी सहभाग घेतला होता. १२९ विमाने आणि ५७१ उपकरणांचा यात समावेश होता. डोंगफेंग मिसाईल (यात छोटे, मोठे आणि मध्यम क्षमतेचे रॉकेट आहेत) आणि रणगाडे व ड्रोन यांच्यासह विविध हत्यारांचे यावेळी प्रदर्शन करण्यात आले.
युद्धाच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे गतीने उतरणे आदी कसरती यावेळी सादर करण्यात आल्या. डोकलाम भागात भारत आणि चीन यांच्यात संघर्ष सुरू असताना हे संचलन आयोजित करण्यात आलेले आहे हे विशेष.

Web Title: cainacai-paunahaa-yaudadhaacai-bhaasaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.