शुक्रवारला १३ तारीख नसणारे कॅलेंडर !

By admin | Published: November 13, 2015 12:49 AM2015-11-13T00:49:18+5:302015-11-13T12:26:19+5:30

शकून-अपशकूनांवर विश्वास ठेवणाऱ्यांची दुनिया वेगळी असते. तारीख १३ आणि शुक्रवार म्हणजे काही तरी आक्रित घडणार अशा अजब भयाने ग्रस्त असलेल्यांची संख्याही जगात कमी नाहीय.

Calendar for 13 days on Friday! | शुक्रवारला १३ तारीख नसणारे कॅलेंडर !

शुक्रवारला १३ तारीख नसणारे कॅलेंडर !

Next

नवी दिल्ली : शकून-अपशकूनांवर विश्वास ठेवणाऱ्यांची दुनिया वेगळी असते. तारीख १३ आणि शुक्रवार म्हणजे काही तरी आक्रित घडणार अशा अजब भयाने ग्रस्त असलेल्यांची संख्याही जगात कमी नाहीय. हे भय निर्माण होण्याचे नेमके कारण कुणालाही सांगता यायचे नाही, मात्र या भयग्रस्ततेला ‘फ्रायगेट्राइस्काइडेकाफोबिक’ असे लांबलचक नाव देण्यात आले आहे. असा अनिष्टकारी योग टाळण्यासाठी ही तारीख शुक्रवारला येऊच नये आणि संबंधितांचे भय दूर राहील, असे एक कॅलेंडरच तयार करण्यात आले आहे.
भारतीय वायुदलाचे माजी अधिकारी बृजभूषण विज यांनी नामी शक्कल काढत खास कॅलेंडर तयार केले. विशेष म्हणजे त्यांनी कालदर्शिका तयार करण्याच्या या कामाची नोंद १९९४ मध्ये लिम्का बुकात करण्यात आल्याचा दावा केला आहे. माझ्या कालदर्शिकेत कधीही १३ तारीख शुक्रवारी येणार नाही, कारण आठवड्याची सुरुवात सोमवारपासून केलेली असते. संक्रांतीला शुक्रवार येत
असल्यास त्या दिवासापासून मी तारखेचा प्रारंभ करतो. नव्या कॅलेंडरची सुरुवात सोमवारपासून होईल, अशा पद्धतीने योजना केलेली असते. सर्व साधारण कालदर्शिकेत दिवस सर्वसाधारणपणे सुरू असतात त्यामुळे अडीच दिवस आपसूक सामावून घेतले जातात. शुक्रवारपासून सोमवारपर्यंतचा अडीच दिवसांचा काळ हटविला जावा, अशीच माझी संकल्पना राहात असल्यामुळे कधीही शुक्रवारी १३ तारीख येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)
२९ फेब्रुवारीला वाढदिवस...
‘डोन्ट वरी’
विज यांच्या कॅलेंडरनुसार २९ फेब्रुवारीला वाढदिवस असेल तरी ‘डोन्ट वरी’. तुम्हाला दरवर्षी केक कापता येईल. तुम्ही सध्याच्या जॉर्जियन कॅलेंडरमध्ये कोणताही बदल केला नाही तरी चालेल. मी केवळ ३१ जुलै ही तारीख हटवून त्याऐवजी २९ फेब्रुवारी केली आहे. नेहमीच्या कॅलेंडरमध्ये चारने भाग जात असलेले लीपवर्ष येत असते. आमच्या कॅलेंडरमध्ये हा लीप दिवस ३० जून आणि १ जुलैदरम्यान येतो. त्यामुळे दरवर्षी २९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा करता येतो.
४५ वर्षांपासून अभ्यास सुरूच...
सध्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या विज यांनी त्यांच्या कॅलेंडरमध्ये मिनिट आणि तासांचे दशांश मोजण्याचे तंत्र अवलंबले. त्यात दिवसांचे २४ तास आणि आठवड्याच्ता रचनेत कोणताही बदल नाही. मी भारतात असतानाही हा विचार मांडला होता. तत्कालीन संरक्षणमंत्री जगजीवन राम यांनी हा मुद्दा संसदेतही उपस्थित केला. अनेक लेखांमधून मी माझ्या कालदर्शिकेची पद्धत सांगण्याचा प्रयत्न केला पण ही कालदर्शिका कुणीही अवलंबली नाही, असेही ते म्हणाले. १९७०पासून मी कॅलेंडरमध्ये सुधारणा घडविण्याचे प्रयत्न चालविले होते.
मी अमेरिकेत अमेरिकन मेट्रिट असोसिएशनकडे माझे विचार मांडल्यानंतर २००२ पासून कॅलेंडर-एल समूहाने त्यावर चर्चा सुरू केली आहे. गेल्या ४५ वर्षांपासून मी माझे काम थांबविलेले नाही. माझे कॅलेंडर स्वीकारण्यासाठी आणखी काही काळ लागेल. माझा अभ्यास शास्त्रीय आधारावर असून सध्याच्या खगोल गणिताशी तो जुळणारा आहे, असा ठाम दावाही त्यांनी केला.

Web Title: Calendar for 13 days on Friday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.