Call Before U-DIG App: PM मोदींनी लॉन्च केले U-DIG ॲप; सरकारचे 3000 कोटी रुपये वाचणार, जाणून घ्या याचे काम...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 06:18 PM2023-03-22T18:18:10+5:302023-03-22T18:19:13+5:30
Call Before U-DIG App: पीएम मोदींनी आज विज्ञान भवनात 6G व्हिजन डॉक्यूमेंट आणि U-DIG अॅप्लिकेशन लॉन्च केले.
Call Before U-DIG App: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज 6G व्हिजन डॉक्युमेंट लाँच केले. यासोबतच पंतप्रधानांनी कॉल बिफोर यू-डीआयजी(Call Before U-DIG) नावाचे मोबाईल अॅप्लिकेशनही लॉन्च केले. या अॅपचा पुढाकार दूरसंचार विभागाने घेतला आहे. हे अॅप सरकारचे पैसे वाचवता यावेत म्हणून सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत देशात कोणताही नवा प्रकल्प किंवा निविदा निघाल्यास त्या प्रकल्पाचे काम थेट एजन्सी सुरू करत असे.
Speaking at inauguration of ITU Area Office & Innovation Centre in Delhi. Initiatives like 6G Test Bed & 'Call Before You Dig' app are also being launched. https://t.co/z6hRdeTPbB
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023
अशा स्थितीत खोदकाम सुरू असताना जमिनीखालील भूमिगत केबल किंवा पाइपलाइन खराब झाल्याने हजारो कोटींचे नुकसान व्हायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, दरवर्षी विकासाशी संबंधित कामे करताना भूमिगत केबल्स तुटल्यामुळे किंवा पाइपलाइन खराब झाल्यामुळे सरकारला सुमारे 3,000 कोटींचे नुकसान सहन करावे लागते.
हा आहे U-DIG चा फायदा ?
हे सर्व टाळण्यासाठी आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा वाचवण्यासाठी दूरसंचार विभागाने यू-डीआयजी मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले आहे. या अंतर्गत खोदकाम करणार्या एजन्सी किंवा टेलिकॉम कंपन्यांना ते काम करणार आहेत, त्या भागात कोणत्या कंपनीची पाइपलाइन किंवा केबल लाइन टाकली आहे का आणि त्या कंपनीची माहिती आधीच मिळेल. केबल किंवा पाइपलाइन लक्षात घेऊन काम केले जाईल आणि सरकारी आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे नुकसान होणार नाही. अनेकवेळा अशा गोष्टींमुळे नागरिकांनाही अनेक दिवस समस्यांना सामोरे जावे लागते.
संबंधित बातमी- 4G-5G विसरा अन् 6G च्या तयारी लागा; PM मोदींनी लॉन्च केले 6G व्हिजन डॉक्यूमेंट, जाणून घ्या माहिती...
सोप्या शब्दात समजावून सांगायचे झाल्यास, समजा तुमच्या परिसरात रस्त्याचे किंवा भुयारी गटाराचे काम सुरू करायचे असेल, तर आधी खोदकाम केले जाते. आतापर्यंत खोदकाम करणाऱ्या एजन्सी थेट कामाला सुरुवात करत असत. अशा परिस्थितीत अनेक वेळा जमिनीखाली टाकलेली पाइपलाइन किंवा वायर खराब व्हायची. पण आता U-DIG अॅप सुरू झाल्यानंतर असे होणार नाही आणि नुकसान कमी करता येईल.