कॉल ड्रॉप; ट्रायच्या भूमिकेचे सरकारकडून कोर्टात समर्थन

By admin | Published: April 22, 2016 03:01 AM2016-04-22T03:01:35+5:302016-04-22T03:01:35+5:30

फोन कॉल खंडित होत असल्याबद्दल (कॉल ड्रॉप) दूरसंचार कंपन्यांवर दंड आकारण्याच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) भूमिकेचे अटर्नी जनरल मुकुल

Call drop; TRI's role in government support from the government | कॉल ड्रॉप; ट्रायच्या भूमिकेचे सरकारकडून कोर्टात समर्थन

कॉल ड्रॉप; ट्रायच्या भूमिकेचे सरकारकडून कोर्टात समर्थन

Next

नवी दिल्ली : फोन कॉल खंडित होत असल्याबद्दल (कॉल ड्रॉप) दूरसंचार कंपन्यांवर दंड आकारण्याच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) भूमिकेचे अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात समर्थन केले आहे.
कॉल ड्रॉपवरील संभाव्य तोडगा आणि तांत्रिक दस्तऐवजांबाबत चर्चेसाठी दूरसंचार मंत्रालयाचे अधिकारी ट्रायच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती रोहतगी यांनी ५ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. तांत्रिक मुद्दे सोडविण्याकरिता ट्रायने दंड नियमनाबाबत फेरविचार करावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १७ मार्च रोजी दिला होता. तांत्रिक बाबी बघून त्या आधारावरच निर्णय घेतला जावा, असेही त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यानंतर या आदेशाचे पालन करीत तांत्रिक आधारावर दंडाबाबत सुधारणा करणार असल्याचे आश्वासन ट्रायने दिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Call drop; TRI's role in government support from the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.