कुंभमेळ्यासाठी अनुभवी अधिकार्यांना पाचारण
By Admin | Published: September 4, 2015 11:12 PM2015-09-04T23:12:40+5:302015-09-04T23:12:40+5:30
पहिल्या पर्वणीनंतर उपरती : दुसर्या पर्वणीत होणार फायदा
प िल्या पर्वणीनंतर उपरती : दुसर्या पर्वणीत होणार फायदानाशिक : पहिल्या पर्वणीत पोलीस बंदोबस्ताचे अतिरेक, भाविकांसह नाशिककरांचे झालेले प्रचंड हाल, भाविकांना करावी लागलेली पायपीट यामुळे माध्यमांनी पोलिसांच्या नियोजनाबाबत टीकेची झोड उठविलीहोती़ या चुकीच्या नियोजनाची पोलीस प्रशासनाला उपरती झाली असून दुसर्या पर्वणीसाठी त्यांनी गत सिंहस्थ कुंभमेळ्याचा अनुभव असलेल्या पोलीस अधिकार्यांना बंदोबस्तासाठी पाचारण केले आहे़गत सिंहस्थ कुंभमेळ्यात सद्यस्थितीत मुंबईला विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले रवींद्र सिंघल हे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर कार्यान्वित होते़ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा पार पडला होता़ तर सद्यस्थितीत पुण्याचे पोलीस उपआयुक्त मकरंद रानडे हे नाशिक शहरात सहायक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते़ या दोघांनाही कुंभमेळ्यातील बंदोबस्ताची तसेच शहराची जाण आहे़ त्यामुळे त्यांच्या या अनुभवाचा लाभ व्हावा यासाठी त्यांना दुसर्या व तिसर्या पर्वणीसाठी पाचारण करण्यात आले आहे़राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी पहिल्या पर्वणीनंतर पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्तांसह पोलीस अधिकार्यांची बैठक घेतली होती़ या बैठकीनंतर पत्रकारांनी त्यांना रवींद्र सिंघल व मकरंद रानडे यांच्या अनुभवाचा फायदा का घेतला जात नाही याबाबत विचारणा केली होती़ त्यानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आला असून ९ ते १५ सप्टेंबर या कालावधीत ते नाशिकला असणार आहे़ तर सिंघल हे नाशिकमध्येच असून त्यांच्याकडे त्र्यंबकेश्वरच्या बंदोबस्ताची जबाबदारी देण्याची शक्यता आहे़ तर मकरंद रानडे यांच्याकडे शहराच्या बंदोबस्ताबाबत जबाबदारी देण्याची शक्यता आहे़ अशोक मोराळे, हेमराजसिंह राजपूत यांना यापूर्वीच सिंहस्थासाठी बोलविण्यात आले आहे़थोडक्यात पोलीस दलास उशिरा का होईना जाग आली असून या अनुभवी अधिकार्यांचा शहरातील बंदोबस्त, तसेच भाविकांची ससेहोलपट कमी करण्यात कितपत फायदा होतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे़ (प्रतिनिधी)