मित्राला कुलगुरू बनविण्यासाठी विंग कमांडरने अमित शाह बनून केला राज्यपालांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 03:30 PM2020-01-11T15:30:52+5:302020-01-11T15:35:01+5:30

मध्य प्रदेशातील आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरपदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अनेक अर्ज आले आहेत. त्यासाठी कुलगुरू निवड समितीने अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

calling the governor as amit shah to appoint friend the vice chancellor | मित्राला कुलगुरू बनविण्यासाठी विंग कमांडरने अमित शाह बनून केला राज्यपालांना फोन

मित्राला कुलगुरू बनविण्यासाठी विंग कमांडरने अमित शाह बनून केला राज्यपालांना फोन

Next

नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदी मित्राची वर्णी लागावी यासाठी एका विंग कमांडरने कायद्याला धाब्यावर बसवून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलत असल्याची बतावणी करून शिफारस केल्याचे समोर आले आहे. विंग कमांडर कुलदीप वाघेला असं आरोपीचं नाव आहे. 

आरोपी कुलदीप वाघेला हे आपले मित्र डॉ. चंद्रेश कुमार शुक्ला यांना विद्यापीठाचे कुलगुरू बनवू इच्छित आहेत. त्यासाठी त्यांनी राज्यपाल लालजी टंडन यांना अमित शाह यांच्या नावे फोन केला. संशय आल्यानंतर  राजभवनाकडून एसटीएफकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

विंग कमांडर कुलदीप वाघेला दिल्लीतील एअर फोर्स हेड क्वार्टर येथे नियुक्त आहेत. त्यांनी अमित शाह बनून राज्यपाल लालजी टंडन यांना फोन केला. तसेच विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. चंद्रेश कुमार शुक्ला यांची नियुक्ती करण्याची शिफारस केली. ही चर्चा फोनवर झाली. फोनवर झालेल्या चर्चेत टंडन यांना संशल आला. त्यानंतर त्यांनी एसटीएफकडे तक्रार केली.

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बंगल्यावरून अशा प्रकारचा कॉल खरच करण्यात आला का, याची चौकशी करण्यात आली. मात्र अशाप्रकाराचा कोणताही कॉल करण्यात आला नाही, अस सांगण्यात आले. त्यानंतर सत्य समोर आले.

मध्य प्रदेशातील आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरपदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अनेक अर्ज आले आहेत. त्यासाठी कुलगुरू निवड समितीने अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

Web Title: calling the governor as amit shah to appoint friend the vice chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.