केळवद... अपघात
By admin | Published: February 18, 2015 11:54 PM2015-02-18T23:54:20+5:302015-02-18T23:54:20+5:30
ऑटो-कार अपघातात दोघे ठार
Next
ऑ ो-कार अपघातात दोघे ठारनऊ प्रवासी जखमी : परसोडी शिवारातील घटना केळवद : भरधाव कारने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोला जबर धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला तर ऑटोमधील नऊ प्रवासी जखमी झाले. ही घटना केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसोडी शिवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.किशोर गंगाधर सिरसाटे (४४, रा. केळवद) व शांताबाई दौलत गिरडे (६५, रा. बाबुळखेडा) असे मृतांची नावे असून जखमींमध्ये सचिन नत्थू झाडे (३०), माया नागोराव तवले (५०), वैष्णवी श्रीखंडे (३०), शालिनी वसंता बोबडे (५०), लता वामन राऊत (३६), तन्मय वैभव श्रीखंडे (१०), वंश श्रीखंडे (६), विशाल तवले (१२), लीला महादेव बेलसरे (४५) यांचा समावेश आहे. जखमींच्या गावांची नावे कळू शकली नाही.केळवद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ऑटोचालक सचिन नत्थू झाडे हा एमएच-४०/ए-४५६१ क्रमांकाच्या ऑटोमध्ये प्रवाशांना घेऊन सावनेरहून केळवदकडे जात होता. दरम्यान, परसोडी शिवारात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमपी-२८/सी-३१८० क्रमांकाच्या भरधाव स्विफ्ट कारने ऑटोला जबर धडक दिली. यात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य नऊ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच केळवद पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जखमींना उपचारार्थ नजीकच्या रुग्णालयात हलविले. या प्रकरणी केळवद पोलिसांनी आरोपी कारचालक डॉ. नयन पांडे (रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३०४(अ)नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास ठाणेदार पारधी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भरणे करीत आहेत. (वार्ताहर)