मंदिराला कॅमेरे लावल्याने रुस्तमजी संचालकाविरुध्द संताप
By admin | Published: March 28, 2016 01:13 AM2016-03-28T01:13:39+5:302016-03-28T01:13:39+5:30
जळगाव :आदर्श नगरातील रुस्तमजी शाळेच्या संचालकांनी शेजारी असलेल्या मंदिरावर कॅमरे लावून त्याचे नियंत्रण स्वत:च्या घरात ठेवल्याने स्थानिक नागरीकांनी रविवारी तीव्र संताप व्यक्त केला.दरम्यान, याबाबत वारंवार तक्रार करुनही पोलीस रहिवाशांचे म्हणणे एकूण न घेता उलट त्यांनाच दमबाजी करीत असल्याचा आरोप यावेळी रहिवाशांनी केला.
Next
ज गाव :आदर्श नगरातील रुस्तमजी शाळेच्या संचालकांनी शेजारी असलेल्या मंदिरावर कॅमरे लावून त्याचे नियंत्रण स्वत:च्या घरात ठेवल्याने स्थानिक नागरीकांनी रविवारी तीव्र संताप व्यक्त केला.दरम्यान, याबाबत वारंवार तक्रार करुनही पोलीस रहिवाशांचे म्हणणे एकूण न घेता उलट त्यांनाच दमबाजी करीत असल्याचा आरोप यावेळी रहिवाशांनी केला.आदर्श नगरात असलेल्या रुस्तमजी शाळेला लागूनच गणपती, दत्त, महादेव, मारोती, श्रीकृष्ण आदी मंदीर एकाच आवारात आहेत.मंदिराला लागून स्वतंत्र वॉलकंपाऊड व प्रवेशद्वार आहे. या मंदीरात शाळेचे संचालक विराफ केसुना यांनी तीन सीसीटीव्ही कॅमरे बसविले आहेत. विशेष म्हणजे तिन्ही कॅमरेर्यांची दिशा मुख्य रस्त्याकडे न ठेवता मंदिराच्या आतील भागात ठेवण्यात आली आहे. त्याचे नियंत्रणही मंदिरात न ठेवता केसुना यांनी त्यांच्या घरात ठेवले आहे. आजपर्यंत मंदिराला पाच रुपयेही दान न देणार्या केसुना यांनी मंदिरात कॅमरे लावून त्याचे नियंत्रण घरात तसेच त्यांच्या शाळेचा सुरक्षा रक्षक मंदीराच्या आवारात बसविण्यामागे कारण काय? असा सवाल मधू भाटीया यांनी केला आहे.रुस्तमजी शाळेने महापालिकेच्या जागेवर कब्जा केला आहे, ते अतिक्रमण काढण्याचे आदेश असतानाही काढले जात नाही, त्यांच्या खाजगी शाळेचा सुरक्षा रक्षक मंदीरात का बसविण्यात येतो, असाही सवाल यावेळी नागरीकांनी केला. यावेळी विनोद रामपाल भाटीया, नरेश कदम, सोमनाथ भामरे, सुनील सपकाळे, तेजू भाटीया, सुनंदा भाटीया, मोहीत शर्मा व तेतरासिंग यांच्यासह अन्य रहिवाशांनी एकत्र येवून मंदिर परिसरात संताप व्यक्त केला. यावेळी रामानंद नगरचा राजेश पाटील नावाचा कर्मचारी रहिवाशांना वारंवार धमकी देत असल्याचा आरोप नागरीकांनी केला.या प्रकारावरुन रहिवाशी सोमवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.