लसीच्या अब्जावधी मात्रा पाेहाेचविण्याची माेहीम; शिवधनुष्य कार्गाे कंपन्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 04:36 AM2020-12-01T04:36:22+5:302020-12-01T04:36:44+5:30
जागेची मर्यादा, सध्या विमान कंपन्यांसमाेर आव्हान आहे ते उपलब्ध जागेचे. महामारीच्या काळात जगभरातील ६० टक्के विमाने जमिनीवरच आहेत.
नवी दिल्ली : लाखाे लाेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या काेविड १९ विषाणूचा संसर्ग राेखण्यासाठी व्यापक लसीकरण आवश्यक आहे. परंतु, खरे आव्हान आहे ते जगाच्या कानाकाेपऱ्यात लस पाेहाेचविण्याचे. त्यासाठी जगभरातील कार्गाे विमान कंपन्या सज्ज झाल्या असून अनेक कंपन्यांनी परिस्थितीचा अंदाजा घेउन आधीपासूनच तयारी सुरू केली आहे.
सध्या विमान कंपन्यांसमाेर आव्हान आहे ते उपलब्ध जागेचे. महामारीच्या काळात जगभरातील ६० टक्के विमाने जमिनीवरच आहेत. आंतरराष्ट्रीय संस्था ‘आयटा’च्या अंदाजानूसार एका बाेइंग ७४७ कार्गाे विमानात ११० टन वजनापर्यंत वाहतूक केली जाउ शकते. हे विचारात घेतल्यास जगभरात १४ अब्ज मात्रा पाेहाेचविण्यासाठी २ वर्ष लागू शकतात. जगभरात सुमारे २००० कार्गाे विमाने आहेत. अनेक कंपन्यांनी सुमारे २५०० प्रवासी विमानांना कार्गाे विमानात परिवर्तित केले आहे. कमी प्रमाणात उड्डाणे हाेत असल्याने लस वाहतुकीला मर्यादा आहेत.
कोरोनाबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली : देशातील कोरोना स्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी, ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना साथीला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत अशा प्रकारची बोलाविण्यात आलेली ही दुसरी बैठक आहे.जगात सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिका प्रथम स्थानी असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. मात्र, कोरोना साथीच्या काळात जगामध्ये दर दहा लाखांमागे सर्वांत कमी मृत्यूदर असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. येत्या शुक्रवारी आयोजित येणाऱ्या बैठकीला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय संसदीय कामकाज खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी आदी उपस्थित राहतील.