...म्हणूनच प्रत्येक जण मोदींना निवडतो;लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचाराचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 08:20 AM2024-01-26T08:20:59+5:302024-01-26T08:22:24+5:30

यावेळी भाजपचे खास निवडणूक थीम साँगही रिलीज करण्यात आले.

Campaigning for the Lok Sabha elections has started from BJP | ...म्हणूनच प्रत्येक जण मोदींना निवडतो;लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचाराचा शुभारंभ

...म्हणूनच प्रत्येक जण मोदींना निवडतो;लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचाराचा शुभारंभ

नवी दिल्ली : अयोध्येत श्रीरामांची नवीन मूर्ती विराजमान झाल्यानंतर आता भाजपने लोकसभा निवडणूक २०२४ साठी प्रचार सुरू केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ केला. 

यावेळी भाजपचे खास निवडणूक थीम साँगही रिलीज करण्यात आले. ‘स्वप्ने नव्हे तर वास्तव विचार करतो - म्हणूनच प्रत्येकजण मोदींना निवडतो’. ही घोषणा प्रत्यक्षात जनतेतूनच आल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. भाजपने सांगितले की, लोकांच्या भावना समजून पक्षाने ही घोषणा स्वीकारली आहे. नवीन घोषणा पक्षाच्या मोदी हमी मोहिमेला पूरक असल्याचे पक्षाने म्हटले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पूर्ण बहुमताने स्थिर सरकार निवडण्यावर जोर देत तरुण मतदारांना लोकसभा निवडणुकीत घराणेशाही पक्षांना पराभूत करण्याचे आवाहन केले. तरुणांची मते भारताची स्थिती आणि दिशा ठरवतील, असे ते म्हणाले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित ‘नमो नवमतदाता संमेलना’ला  ते संबांधित करत होते.

तुमची स्वप्ने हा माझा संकल्प आहे
भाजपच्या जाहीरनाम्यासाठी सूचना देण्याचे आवाहन मोदींनी केले. सर्वोत्तम सूचना शेअर करणाऱ्या निवडक लोकांना वैयक्तिकरीत्या भेटणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आजकाल विविध क्षेत्रातील विश्वासार्हता आणि यशोगाथा याबद्दल बोलले जाते. तुमची स्वप्ने हा माझा संकल्प आहे. ही मोदींची हमी आहे.

तरुणांसाठी अहोरात्र काम करत आहोत
“तरुणांना नेहमीच आपले प्राधान्य राहिले आहे. विविध क्षेत्रातील सुधारणांमुळे त्यांच्यासाठी अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत.
आमचे सरकार त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता वाढविण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. भाजपच्या विकासाच्या अजेंड्याला मतदारांचा पाठिंबा आहे,” असेही ते म्हणाले.

Web Title: Campaigning for the Lok Sabha elections has started from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.