नववर्षात ९ राज्यांत प्रचाराचा धुरळा, विधानसभा निवडणुकांतून लोकसभेची ‘लिटमस टेस्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 06:20 AM2023-01-01T06:20:33+5:302023-01-01T06:20:55+5:30

भाजपला राजस्थान व छत्तीसगडमध्येही ताकद वाढवायची आहे, तिथे काँग्रेस सत्तेत आहे.

Campaigning in 9 states in the new year, 'litmus test' of Lok Sabha through assembly elections | नववर्षात ९ राज्यांत प्रचाराचा धुरळा, विधानसभा निवडणुकांतून लोकसभेची ‘लिटमस टेस्ट’

नववर्षात ९ राज्यांत प्रचाराचा धुरळा, विधानसभा निवडणुकांतून लोकसभेची ‘लिटमस टेस्ट’

Next

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : २०२३ या नववर्षात ९ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार असून, लोकसभेची सेमीफायनल म्हणून याकडे बघितले जात आहे. मोदींचा करिष्मा अजूनही कायम असला, तरी भाजप नेतृत्वाला यातील काही राज्यांत गुजरातप्रमाणे विजय खेचून आणणे कठीण जाणार आहे. त्रिपुरा, कर्नाटक, मध्य प्रदेशातही भाजपची सत्ता आहे. नागालँड व मिझोराममध्ये सत्ताधारी एनडीपीपी व एमएनएफ हे एनडीएचे भाग आहेत, तर मेघालयात मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांचा एनपीपी एनडीएतून बाहेर पडला आहे.

भाजपला राजस्थान व छत्तीसगडमध्येही ताकद वाढवायची आहे, तिथे काँग्रेस सत्तेत आहे. त्रिपुरामध्ये भाजपला आधीच गंभीर आव्हानाचा सामना करावा लागत आहे, तेथे भाजपच्या अर्धा डझनहून अधिक आमदारांनी राजीनामा दिला आहे प्रमुख प्रादेशिक मित्रपक्षाने भाजपशी संबंध तोडल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे.

मध्य प्रदेशमध्ये आव्हान
- भाजपची पुढची मोठी चिंता आहे मध्य प्रदेश. इथे त्यांना प्रतिकूल अहवाल मिळत आहे. या वर्षी नोव्हेंबर-
डिसेंबरमध्ये मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत. शिवराज सिंह चौहान यांना बदलण्याचा पक्ष नेतृत्वाचा 
विचार आहे. 
- गुजरातमध्ये सत्ताविरोधी लाटेच्या संभाव्य शक्यतेच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह त्यांची पूर्ण टीम निवडणुकीच्या एक वर्ष अगोदर बदलली होती. हा प्रयोग यशस्वी झाला आणि पक्षाला तिथे मोठे यश मिळाले. असाच प्रयोग तिथे होणार असेल, तर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. 

कर्नाटकात भाजप स्वबळावर 
भाजपला स्वबळावर दोन तृतीयांश बहुमत मिळवून कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करता यावे, यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंगळुरूमध्ये कार्यक्रमात म्हटले आहे. 

येडियुरप्पा अस्वस्थ
कर्नाटकात बी.एस. येडियुरप्पा यांना शांत करण्यासाठी व संसदीय मंडळात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु आपल्या पुत्राला बोम्मई यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करावे, असा येडियुरप्पा यांचा आग्रह आहे. येडियुरप्पा यांच्या मुलाला या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, याबाबत अनिश्चितता कायम आहे.  

Web Title: Campaigning in 9 states in the new year, 'litmus test' of Lok Sabha through assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.