हरयाणात प्रचार संपला, कोण जिंकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 06:12 AM2024-10-04T06:12:49+5:302024-10-04T06:13:04+5:30

निवडणुकीत दोन कोटींहून अधिक मतदार मतदान करण्यास पात्र आहेत, त्यापैकी ८,८२१ मतदार हे १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

Campaigning is over in Haryana, who will win? | हरयाणात प्रचार संपला, कोण जिंकणार?

हरयाणात प्रचार संपला, कोण जिंकणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : हरयाणामध्ये ५ ऑक्टोबरला होणाऱ्या  निवडणुकीचा प्रचार गुरुवारी संध्याकाळी संपला. भाजप सत्ताविरोधी लाटेवर मात करून सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेसला दशकभराधीनंतर पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. 

निवडणुकीत दोन कोटींहून अधिक मतदार मतदान करण्यास पात्र आहेत, त्यापैकी ८,८२१ मतदार हे १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. संध्याकाळी ६ वाजता निवडणूक प्रचार संपण्याच्या काही तास आधी, प्रमुख पक्ष भाजप, काँग्रेस, आप, इनेलो-बसपा, जजपा-आझाद समाज पक्षाने रॅली आणि रोड शो घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. हरयाणातील सर्व ९० मतदारसंघांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणातील दोषी गुरमीत राम रहीम सिंग याला २० दिवसांचा पॅरोल देण्यात आला आहे.

भाजपचे नेते व माजी खासदार अशोक तंवर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महेंद्रगड जिल्ह्यात आयोजित काँग्रेसच्या प्रचारसभेच्या कार्यक्रमात राहुल गांधींच्या उपस्थितीत तंवर काँग्रेसमध्ये दाखल झाले. तंवर यांनी गत ५ वर्षांत ४ वेळा पक्ष बदलला आहे. 

Web Title: Campaigning is over in Haryana, who will win?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Haryanaहरयाणा