एकदा पाठवलेला मेल आता करता येणार 'Undo'

By admin | Published: June 24, 2015 11:52 AM2015-06-24T11:52:45+5:302015-06-24T12:57:14+5:30

'जीमेल'ने एकदा पाठवलेला इ-मेल 'Undo' करण्याची म्हणजेच परत घेण्याची नवी सुविधा उपलब्ध करून दिली असून इ-मेल पाठवल्यानंतर अवघ्या ३० सेंकदात तो परत घेता येईल

Can be sent once sent 'Undo' | एकदा पाठवलेला मेल आता करता येणार 'Undo'

एकदा पाठवलेला मेल आता करता येणार 'Undo'

Next
>ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. २४ - असं म्हणतात की मुखातून निघालेला शब्द, बंदुकीतून सुटलेली गोळी परत घेता येत नाही.. आजच्या टेक्नोसॅव्ही जमान्यात ही म्हण इमेलच्या बाबतही लागू होते.  यातील पहिल्या दोन गोष्टी जरी ख-या असल्या तरी ईमेलच्या बाबतीत अाता असे घडणार नाही, म्हणजेच एकदा पाठवलेला ई-मेल तुम्ही आता परत घेऊ शकता.त्याचं  कारण म्हणजे 'जीमेल'ने एकदा पाठवलेला इ-मेल 'Undo' करण्याची म्हणजेच परत घेण्याची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे 'सेंड' केलेल्या एखाद्या मेलमध्ये काही दुरूस्ती करायची असेल किंवा तो न पाठवायचाच नसेल तर आता चिंतेचे मुळीच कारण नाही. मात्र इ-मेल पाठविल्यानंतर अवघ्या ३० सेंकदातच तुम्हाला तो परत घेता येईल.
'गूगल'ने आपल्या 'जीमेल' इनबॉक्समध्ये एक नवीन फीचर जोडले आहे. खरतर जीमेलच्या पब्लिक बीटा आवृत्तीवर ही सुविधा गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध होती, मात्र आता डेस्कटॉप युझर्ससाठीही ही सुविधा देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे ही सुविधा आधीच उपलब्ध होती, त्यांच्यासाठी ती यापुढेही अशीच सुरू राहील. मात्र ज्यांच्याकडेही सुविधा नाही, ते युझर्स 'जी-मेल'च्या सेंटिग्जमध्ये जाऊन ही सुविधा सुरू करू शकतात. २००९ साली सुरू झालेल्या या सुविधेत युझर्सना पाठवलेली इ-मेल थांबवण्यासाठी यापूर्वी फक्त ५ सेकंदांचा अवधी मिळायचा मात्र आता तो वाढवून ३० सेकंदापर्यंतचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. 
ही सुविधा कशी सुरू कराल? 
- प्रथम जीमेलच्या सेटिंग्जमध्ये जा. 
- त्यानंतर जनरल टॅबवर क्लिक करा. तेथे खाली डाव्या बाजूला 'Undo Send' नावाचा ऑप्शन दिसेल, त्यासमोरील 'Enable Undo Send' ऑप्शनच्या चौकटीवर क्लिक करा. 
- त्याखालीच 'Send Cancellation period' असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून इमेल थांबवण्याचा अवधी ५ ते ३० सेकंदादरम्यान सेट करू शकता.
- त्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मेल टाईप करून पाठवाल, त्यानंतर sedning असे दिसेल. त्यापुढे 'Your message has been sent' असा मेसेज दिसल्यानंतर  'Undo' किंवा  'View message' असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी 'Undo' पर्यायवर क्लिक केल्यास तुम्ही पाठवलेला मेल थांबून त्या 'इमेल'ची विंडो तुमच्यासाठी ओपन होईल. त्यात योग्य ती दुरूस्ती करून तुम्ही तो इमेल परत पाठवू शकता.

Web Title: Can be sent once sent 'Undo'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.