मुस्लीम RSS मध्ये येऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, सर्व भारतीयांचे स्वागत, पण...! ठेवली अशी अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 10:32 IST2025-04-07T10:31:47+5:302025-04-07T10:32:12+5:30
यावेळी, भागवत यांनी जातीय भेदभाव नष्ट करण्यासंदर्भात, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसह अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त करत, एक बलशाली समाज निर्माण करण्यासंदर्भात भाष्य केले.

मुस्लीम RSS मध्ये येऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, सर्व भारतीयांचे स्वागत, पण...! ठेवली अशी अट
सध्या सरसंघचालक मोहन भागवत हे 4 दिवसीय वाराणसी दौऱ्यावर आहेत. यावेळी मुस्लीम समाजाच्या संघ सहभागासंदर्भात करण्यात आलेल्या एका प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. भारत माता की जय या घोषणेचा आणि भगव्या ध्वजाचा आदर करतात ते शाखेत येऊ शकतात, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. त्यांनी रविवारी वाराणसीतील लाजपत नगर कॉलनी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी, भागवत यांनी जातीय भेदभाव नष्ट करण्यासंदर्भात, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसह अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त करत, एक बलशाली समाज निर्माण करण्यासंदर्भात भाष्य केले. यावेळी, मुस्लीम व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी होऊ शकते का? असा प्रश्न एका स्वयंसेवकाने भागवत यांना केला.
या स्वयं सेवकाच्या प्रश्नाला उत्तर देताना भागवत म्हणाले, "शाखेत (RSS) सर्व भारतीयांचे स्वागत आहे. मात्र यासाठी एक अट आहे, ती म्हणजे, शाखेत येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला 'भारत माता की जय' ही घोषणा देतास संकोच वाटू नये आणि त्याने भगव्या ध्वजाचा आदर करायला हवा." भागवतांच्या या उत्तराची सर्वत्र चर्चा होत आहे.
शाकेत सर्वांचे स्वागत -
मोहन भागवत पुढे म्हणाले, भारतातील लोकांचे धर्म वेगवेगळे असले तरी, संकृती मात्र सर्वांची एकच आहे. ते म्हणाले, प्रत्येक शाखेवर भारतातील सर्व धर्म, पंथ आणि जातीच्या लोकांचे स्वागत करण्यात आले आहे. यापूर्वी शनिवारी (5 एप्रिल 2025) सायंकाळी त्यांनी काशीतील वैदिक विद्वानांसोबत बैठक केली.