‘कांद्याचे दर स्थिर ठेवणे शक्य नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 02:01 AM2017-12-01T02:01:48+5:302017-12-01T02:02:08+5:30
कांद्याचे दर वाढल्याने घरचे बजेट बिघडले असतानाच, हे भाव स्थिर ठेवणे केंद्राच्या हातात नाही, अशी भूमिका केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी घेतली आहे.
नवी दिल्ली : कांद्याचे दर वाढल्याने घरचे बजेट बिघडले असतानाच, हे भाव स्थिर ठेवणे केंद्राच्या हातात नाही, अशी भूमिका केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी घेतली आहे.
गेल्या वर्षी देशात २ लाख ६५ हजार हेक्टरवर कांद्याचे उत्पादन घेतले गेले होते. यंदा १ लाख ९0 हजार हेक्टरवरच कांदा घेण्यात आला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत, असे
सांगतानाच, आम्ही कांदा आयात करीत आहोत, असे सांगून
ते म्हणाले की, असे असले तरी त्यांचे दर स्थिर राहतील, असे सांगणे शक्य नाही.
कांद्याबरोबरच टोमॅटोही महागला आहे. या दोन्हींबाबत पासवान यांनी संबंधित अधिकाºयांची बैठक बोलावली होती. महाराष्ट्रात ३0 ते ४0 रुपये कांद्याचा दर असला तरी दिल्लीसह काही राज्यांत तो ७0 रुपयांवर गेला आहे. तसेच टोमॅटो महाराष्ट्रात ५0 ते ६0 रुपये आहे, तर दिल्लीत तो ८0 रुपयांवर गेला आहे.