व्हिसा मुलाखत स्थानिक भाषेत देता येते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2022 11:32 AM2022-10-09T11:32:44+5:302022-10-09T11:33:00+5:30

मुलाखतपूर्व वेळेमध्ये इनटेक प्रोसेस ज्यावेळी सुरू असते त्यावेळी हे करता येऊ शकेल.

Can visa interview be given in local language? | व्हिसा मुलाखत स्थानिक भाषेत देता येते का?

व्हिसा मुलाखत स्थानिक भाषेत देता येते का?

Next

प्रश्न : व्हिसा मुलाखतीची वेळ निश्चित करतेवेळी मला माझी स्थानिक भाषा निवडता आली नाही. माझ्या मुलाखतीसाठी अनुवाद सेवेची मदत मिळेल का?
उत्तर : व्हिसा मुलाखतीसाठी प्रचंड प्रमाणात मागणी वाढल्यामुळे सध्या स्थानिक भाषेतील मुलाखतीचे स्लॉटस् मुंबईतील यू. एस. कौन्सुलेट जनरल येथे उपलब्ध नाहीत. तथापि, ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून आम्ही अनुवादाची सेवा पुरवित आहोत. ज्यावेळी अर्जदार त्यांच्या मुलाखतीच्या नियोजित वेळी कौन्सुलेटमध्ये येतील त्यावेळी त्यांच्या मुलाखतीची भाषा बदलण्यासाठी विनंती करण्याची संधी त्यांना देण्यात येते.

मुलाखतपूर्व वेळेमध्ये इनटेक प्रोसेस ज्यावेळी सुरू असते त्यावेळी हे करता येऊ शकेल. मात्र, काही विशिष्ट प्रकारच्या व्हिसांसाठी इंग्रजी भाषा सफाईदारपणे येणे हा निकष आहे. मुंबईतील यू. एस. कौन्सुलेटतर्फे प्रामुख्याने गुजराती, हिंदी, मराठी भाषेसाठी मदतसेवा पुरवली जाते. इतर भाषांतील अनुवाद सेवा ही आवश्यकतेनुसार उपलब्ध आहे. जर आमच्याकडे अनुवादक उपलब्ध नसेल तर आम्ही दुसऱ्या किंवा अन्य दिवशी येण्याचे कळवितो. प्रत्येक वेळी अनुवादाची सेवा देणे जमेलच असे नाही, पण तरीही आम्ही सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतो. 

महत्त्वाची सूचना : व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी  http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

Web Title: Can visa interview be given in local language?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.