असा वाढू शकतो तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड?

By admin | Published: February 8, 2017 07:52 AM2017-02-08T07:52:58+5:302017-02-08T07:52:58+5:30

3G किंवा 4G डेटा पॅक टाकून सुद्धा इंटरनेटला स्पीड मिळत नाही यामुळे अनेकांचा संताप अनावर होतो.

Can you grow your mobile internet speed? | असा वाढू शकतो तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड?

असा वाढू शकतो तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड?

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 08 -
मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या देशात ३० कोटींपेक्षाही अधिक आहे. त्यात दर महिन्याला कोट्यवधी युजर्सची भरही पडत आहे. मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढण्याचा वेग मोठा आहे. 3G किंवा 4G डेटा पॅक टाकून सुद्धा इंटरनेटला स्पीड मिळत नाही यामुळे अनेकांचा संताप अनावर होतो. काही वेळेस आपण टेलिकॉम कंपनीला दोष देत असतो पण इंटरनेटचा स्पीड आपल्या काही चुकीच्या गोष्टीमुळे सुद्धा कमी होत असतो. त्यामुळे काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

ब्राउझर : तुमच्या मोबाईलच्या दृष्टीने कोणते ब्राऊझिंग अ‍ॅप चांगले आहे ते निवडावे. ब्राऊझिंग अ‍ॅप निवडताना त्याची साईझ, विश्वासहार्यता, डेटा किती खातो अशा गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गुगल क्रोम हा अँड्रॉइडसाठी सर्वोत्तम ब्राउझर्स पैकी एक आहे. हा ब्राउझर तुमचे पासवर्ड, तसेच बुकमार्क्स लक्षात ठेवतो.

Cache क्लिअर करा : जर तुमचा फोन स्लो किंवा इंटरनेटचा स्पीड कमी झाला असेल तर मोबाईल व ब्राउझर मधील कॅशे (Cache) डिलिट करा. वेळोवेळी कॅशे क्लिअर केला, तर फोन आणि इंटरनेट व्यवस्थित चालते.

अनावश्यक अ‍ॅप्स काढा : अ‍ॅप आवडलेकी आपण ते डाउनलोड करतो किंवा शेअरिंगने घेतो. त्याचा वापर होवो अथवा न होवो आपण त्याला अनइन्स्टॉल करत नाही. त्यामुळे ते अ‍ॅप मोबाईल मधील जागा खाते शिवाय बॅकग्राउंडलाही सुरू राहते. त्यामुळे फोन आणि इंटरनेट स्लो होते. म्हणूनच अनावश्यक अ‍ॅप काढून टाका.

इमेजेस डिसेबल करा : इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी मोबाईलचा ब्राउझर ह्यटेक्स्ट ओन्ली मोड वर ठेवा. फोनच्या किंवा ब्राउझरच्या सेटिंग्जमध्ये तो पर्याय उपलब्ध असतो. टेक्स्ट ओन्ली मोड सुरू केला, की ब्राउझरमध्ये फोटो लोड होणार नाहीत. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड काही प्रमाणात वाढण्यास मदत होते.

Web Title: Can you grow your mobile internet speed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.