आता लवकरच विमानात व्हाईस कॉल आणि इंटरनेटचा वापर करता येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 05:24 PM2018-01-18T17:24:14+5:302018-01-18T17:39:39+5:30
हवाई प्रवास करतेळी आपल्याला विमानात स्वत:कडे असलेला मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवण्याची सूचना देण्यात येते. मात्र, आता ही सूचना बंद होण्याची शक्यता आहे. कारण, तुम्ही मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये न ठेवता सरळ विमानातून कॉल करु शकता. याशिवाय कोणत्याही अडथळ्याशिवाय इंटरनेटचा वापर सुद्धा करु शकता. दरम्यान, यासंदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण लवकरच नागरी उड्डान संचालनालयला (डीजीसीए) प्रस्ताव पाठविणार आहे.
नवी दिल्ली : हवाई प्रवास करतेळी आपल्याला विमानात स्वत:कडे असलेला मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवण्याची सूचना देण्यात येते. मात्र, आता ही सूचना बंद होण्याची शक्यता आहे. कारण, तुम्ही मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये न ठेवता सरळ विमानातून कॉल करु शकता. याशिवाय कोणत्याही अडथळ्याशिवाय इंटरनेटचा वापर सुद्धा करु शकता. दरम्यान, यासंदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण लवकरच नागरी उड्डान संचालनालयला(डीजीसीए) प्रस्ताव पाठविणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात प्रवास करताना व्हाईस कॉल करण्यासाठी आणि मोबाइल डेटा वापरण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच डीजीसीएकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव जर डीजीसीएने मान्य केला, तर हवाई प्रवास करण्या-यांसाठी व्हाईस कॉल आणि मोबाइल डेटा या सुविधांचा उपयोग लकरच करता येणार आहे.
विमानात सुरक्षतेच्या दृष्टीकोणातून मोबाइल फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवायला सांगितले जाते. फ्लाइट मोडमध्ये ठेवण्यानंतर प्रवाशाला व्हाईस कॉल किंवा मोबाइट डेटा वापरता येत नाही. त्यामुळे यावर उपाय काढण्याचे काम भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे.
लोकांना मोबाइलचा सुलभ करता यावा, यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने आंतरराष्ट्रीय इनकमिंग कॉलच्या टर्मिनेशन शुल्कात घट केली आहे. यामध्ये प्रतिमिनिट 53 पैशांची घट करुन 30 पैसे प्रतिमिनिट केले आहे. हे नवीन दर येत्या एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.