"मला 500 रुपये पाठवू शकता का? कोर्टात...", सरन्यायाधीशांच्या नावाने मागितले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:55 PM2024-08-28T12:55:30+5:302024-08-28T12:59:01+5:30

CJI Scammer: वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने लोकांना लुबाडण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता तर एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, स्कॅमर्सने सरन्यायाधीश असल्याचे दाखवून पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला.

"Can you send me 500 rupees?", the money demanded in the name of the Chief Justice d y chandrachud | "मला 500 रुपये पाठवू शकता का? कोर्टात...", सरन्यायाधीशांच्या नावाने मागितले पैसे

"मला 500 रुपये पाठवू शकता का? कोर्टात...", सरन्यायाधीशांच्या नावाने मागितले पैसे

CJI Chandrachud News: कुठल्यातरी व्यक्तीच्या नावाने अकाऊंट सुरू करून पैसे मागण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. सायबर ठगांनी यातून सरन्यायाधीशांनाही सोडले नाही. मी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याचे सांगून एका व्यक्तीकडे पैशाची मागणी केली. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. सध्या पैसे मागणारा कोण, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे 

सरन्यायाधीशांच्या नावाने मागितले पैसे, मेसेजमध्ये काय?

जो मेसेज व्हायरल होत आहे, त्यात सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा फोटो दिसत आहे. CJI DYC अशा नावाने हा मेसेज पाठवण्यात आला आहे. 

मेसेजमध्ये म्हटले आहे की, "नमस्कार! मी सरन्यायाधीश आहे. आमची कॉलेजियमची तातडीची बैठक आहे आणि मी मी कॅनॉट प्लेसमध्ये अडकलो आहे. तुम्ही मला ५०० रुपये पाठवू शकता का? न्यायालयात पोहोचल्यानंतर मी पैसे परत करतो. मेसेज सेंड फ्रॉम आयपॅड."

A fraudster posing as the CJI Chandrachud sent messages to People.
A fraudster posing as the CJI Chandrachud sent messages to People.

नेमके घडले काय?

सोशल मीडियावर एका यूजरने फोटो पोस्ट केला. मला एक मेसेज आला असून, सरन्यायाधीशांच्या नावाने मला पैसे मागण्यात आल्याचे या युजरने सांगितले. 

सरन्यायाधीशांच्या नावाने असलेला हा मेसेज सोशल मीडियावर पसरला. हा प्रकार सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. व्हायरल होत असलेल्या पोस्टची दखल घेत सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली.  या प्रकरणाचा तपास आता दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम शाखेने सुरू केला आहे.

स्कॅमच्या घटनांमध्ये वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ३० मे रोजी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, आर्थिक घोटाळ्याच्या घटना वाढल्या आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात त्याच्या मागील वर्षाच्या तुलनेत १६६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तब्बल ३६ हजार ७५ घटना घडल्या आहेत. 

Web Title: "Can you send me 500 rupees?", the money demanded in the name of the Chief Justice d y chandrachud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.