कॅनाडाचं अत्यंत हीन कृत्य, चीन-पाकिस्तानंही कधी असं केलं नाही! भारतानंही दिलं चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 08:01 PM2023-09-19T20:01:29+5:302023-09-19T20:02:43+5:30

....आता आणखी एक पाऊल पुढे टाकत कॅनाडाने असे कृत्य केले आहे, जसे कधी पाकिस्‍तान आणि चीनसारख्या विरोधी देशांनीही केले नाही.

canada news justin trudeau govt reveals raw officer name; India also gave a befitting reply | कॅनाडाचं अत्यंत हीन कृत्य, चीन-पाकिस्तानंही कधी असं केलं नाही! भारतानंही दिलं चोख प्रत्युत्तर

कॅनाडाचं अत्यंत हीन कृत्य, चीन-पाकिस्तानंही कधी असं केलं नाही! भारतानंही दिलं चोख प्रत्युत्तर

googlenewsNext

खालिस्‍तान समर्थक कॅनाडासोबतचे भारताचे संबंध अत्यंत बिघडले आहेत. एक दिवस आधीच पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी, कॅनाडाच्या भूमीवर खालिस्‍तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्‍जरच्या हत्तेचा आरोप भारतीय संरक्षण संस्थेवर केला होता. एवढेच नाही, तर आता आणखी एक पाऊल पुढे टाकत कॅनाडाने असे कृत्य केले आहे, जसे कधी पाकिस्‍तान आणि चीनसारख्या विरोधी देशांनीही केले नाही. कॅनाडाने भारतीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी पवन कुमार राय यांचे नाव जाणूनबुजून उघड कले आहे.

यापूर्वी भारताने चीन आणि पाकिस्‍तानच्या राजदुतांवर कारवाई केली. मात्र, कधीही गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्याचे नाव उघड केले नाही. एवढेच नाही, तर भारताचे कट्टर विरोधी देश असलेल्या चीन आणि पाकिस्‍ताननेही असे केले नाही. कॅनडाच्या या अत्यंत खालच्या दर्जाच्या कृत्यावर सर्वच स्थरांतून टीका होत आहे.

गुप्तचर संस्थेतील अधिकाऱ्यासंदर्भात अशी आहे परंपरा - 
गुप्तचर संस्थेतील अधिकाऱ्यासंदर्भात एक जुनीच परंपरा आहे.  दुसऱ्या देशांतील दूतावासात गुप्तचर संस्थेचा एक अधिकारीही तैनात असतो. यासंदर्भात केवळ संबंधित देशातील सरकारलाच माहिती दिली जाते. मात्र, संबंधित देश या अधिकाऱ्याचे नाव कधीही उघड करत नाही, अशी परंपरा आहे. मात्र, कॅनडाने भारतीय संस्थेचे अधिकारी पवन कुमार राय यांचे उघड करून अत्यंत हीन दर्जाचे कृत्य तेले आहे. कॅनडाने पवन कुमार राय यांना भारत परतण्याचे फरमान सोडले आहे.

भारताचंही चौख प्रत्युत्तर - 
कॅनाडाच्या या कृत्याचे भारतानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. भारतानेही कारवाई करत कॅनडाच्या गुप्तचर संस्थेचे अधिकारी ऑलिव्हियर सिल्वेस्टर यांना निष्कासित केले आहे. त्यांना पुढील पाच दिवसांच्या आत भारत सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच, भारत सरकारने कॅनाडाचे सर्वच आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याचे म्हटले असून त्यांना भारता विरोधी काम करत असलेल्या खालिस्‍तानी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.

Web Title: canada news justin trudeau govt reveals raw officer name; India also gave a befitting reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.