कॅनडात शीख अतिरेकी सक्रिय

By admin | Published: May 31, 2016 06:42 AM2016-05-31T06:42:12+5:302016-05-31T06:42:12+5:30

पंजाबमध्ये हल्ले करण्यासाठी खलिस्तान समर्थक दहशतवादी कॅनडामध्ये प्रशिक्षण शिबिर चालवित आहे, असे भारतीय गुप्तचर संस्थांनी कॅनडा सरकारला कळविले आहे.

In Canada, terrorism activates | कॅनडात शीख अतिरेकी सक्रिय

कॅनडात शीख अतिरेकी सक्रिय

Next

चंदीगड : पंजाबमध्ये हल्ले करण्यासाठी खलिस्तान समर्थक दहशतवादी कॅनडामध्ये प्रशिक्षण शिबिर चालवित आहे, असे भारतीय गुप्तचर संस्थांनी कॅनडा सरकारला कळविले आहे. पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याच्या सहा महिन्यांनंतर पंजाबात पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा हा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे, हे विशेष.
पंजाब गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या अहवालानुसार, कॅनडीयन शीख असलेला हरदीप निज्जार याने खलिस्तान टेरर फोर्सचे (केटीएफ) प्रमुखपद स्वीकारले आहे आणि पंजाबमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या उद्देशाने त्याने शीख युवकांचे एक गट पथक तयार केले आहे. पंजाब सरकारने अगोदरच अहवाल परराष्ट्र मंत्रालय व गृह मंत्रालयाला सादर करून निज्जारचे कॅनडातून प्रत्यार्पण करण्याची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: In Canada, terrorism activates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.