कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांच्या विमानात तांत्रिक बिघाड; भारतातील मुक्काम वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 08:41 PM2023-09-11T20:41:10+5:302023-09-11T20:42:30+5:30
जी-20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या जस्टीन ट्रुडो यांना घेण्यासाठी एक बॅकअप विमान कॅनडातून रवाना झाले आहे.
G20 New Delhi: राजधानी दिल्लीत आयोजित G-20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेले कॅनडाचेपंतप्रधान जस्टिन ट्रूडो (justin trudeau) यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्यांचा भारतातील मुक्काम वाढला आहे. कॅनेडियन वृत्तपत्र CTV नुसार, एक बॅकअप विमान पीएम ट्रुडो आणि भारतात अडकलेल्या कॅनडाच्या शिष्टमंडळाला घेण्यासाठी पाठवण्यात आले आहे.
J’ai rencontré le premier ministre @NarendraModi aujourd’hui. Nous avons parlé de nos priorités pour le @G20org et des progrès réalisés ces derniers jours – ainsi que de nos points de vue sur le climat, l’égalité des sexes, le soutien à l’Ukraine et la primauté du droit. pic.twitter.com/DGsRE9kfLk
— Justin Trudeau (@JustinTrudeau) September 10, 2023
कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जस्टिन ट्रूडो आणि शिष्टमंडळाला परत आणण्यासाठी एक बॅकअप एअरबस CFC002 भारताकडे रवाना झाले आहे. हे विमान आज रात्री दिल्लीत लँड करेल आणि ट्रुडो उद्या सकाळी कॅनडाच्या दिशेने निघण्याची शक्यता आहे. पंतप्रधान ट्रुडो यांचे प्रेस सचिव मोहम्मद हुसैन यांनी एका निवेदनात ही माहिती दिली.
पीएम मोदींसोबत बैठक
तत्पूर्वी रविवारी संध्याकाळी ट्रुडो यांनी पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेतली. जस्टिन ट्रूडो 8 सप्टेंबर रोजी G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. रविवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्यांचा मुद्दा या बैठकीतील प्रमुख विषयांपैकी एक होता. पंतप्रधान मोदींनी कॅनडातील अतिरेकी घटकांच्या भारतविरोधी कारवायांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.