पलाणीस्वामी सरकारचा विश्वासदर्शक ठराव रद्द करा

By admin | Published: February 20, 2017 01:10 AM2017-02-20T01:10:20+5:302017-02-20T01:10:20+5:30

पलाणीस्वामी यांच्या सरकारने विधानसभेचे नियम मोडून सभागृहात मंजूर करुन घेतलेला विश्वासदर्शक ठराव रद्द करावा, अशी

Cancel the confidence motion of the Palaniswamy Government | पलाणीस्वामी सरकारचा विश्वासदर्शक ठराव रद्द करा

पलाणीस्वामी सरकारचा विश्वासदर्शक ठराव रद्द करा

Next

चेन्नई : पलाणीस्वामी यांच्या सरकारने विधानसभेचे नियम मोडून सभागृहात मंजूर करुन घेतलेला विश्वासदर्शक ठराव रद्द करावा, अशी मागणी द्रमुकच्या आमदारांनी राज्यपाल सीएच विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे.
ही लोकशाहीची हत्या असून याच्या निषेधार्थ २२ रोजी राज्यात ठिकठिकाणी उपोषण करणार असल्याचा इशाराही द्रमुकने दिला आहे. द्रमुकचे राज्यसभा सदस्य आर. एस. भारती, टी.के. एस. एलंगोवन आणि तिरुचि एन शिवा यांची यावेळी उपस्थिती होती. द्रमुकच्या वतीने २२ रोजी राज्यात ठिकठिकाणी उपोषण करण्यात येणार आहे.

स्टॅलिनसह आमदार, खासदारांवर गुन्हा
चेन्नई : मरीना बीच येथे आंदोलन केल्याप्रकरणी द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन व पक्षाचे आमदार, खासदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी स्टॅलिन हे मरीना बीचवर आंदोलन करत होते. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, द्रमुकने पूर्वपरवानगीशिवाय हे आंदोलन केले. स्टॅलिन यांच्यासह ६३ आमदार, तीन खासदार आणि द्रमुकच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Cancel the confidence motion of the Palaniswamy Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.