निकाल रद्द की, यादीत दुरुस्ती तलाठी भरती : प्रशासनाचे चाचपडणे सुरूच
By admin | Published: April 15, 2016 01:55 AM2016-04-15T01:55:13+5:302016-04-15T23:35:50+5:30
नाशिक : तलाठी भरतीत उमेदवारांची निवड करताना झालेल्या गैरप्रकाराचे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच, चाचपडणार्या प्रशासनाने उलट-सुलट निर्णय घेऊन हजारो उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. जाहीर केलेली निवड यादी अंतिम नाही असे एकीकडे सांगत असतानाच तलाठी भरतीची निवड यादी रद्द केल्याचे जाहीर करणार्या प्रशासनाने दुसरीकडे अन्याय झालेल्या उमेदवारांकडून लेखी तक्रारीही मागितल्या आहेत. त्यामुळे प्रशासन नेमके काय करणार याविषयी स्पष्ट उलगडा होत नाही.

लिपिक व तलाठी भरतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर उघड झालेल्या बाबींमुळे अडचणीत आलेल्या प्रशासनाने आता कालापरत्वे भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. जाहीर झालेली निवड यादी अंतिम नाही, त्यात फेरबदल होऊ शकतो असे एकीकडे सांगतानाच, संपूर्ण निवड यादीच रद्द करून २१ एप्रिलनंतर नव्याने यादी जाहीर करण्याचा मनोदयही प्रशासनाने बोलून दाखविला आहे. या निवड यादी विषयी प्रामुख्याने कमी गुण मिळालेल्यांना थेट नियुक्ती देतानाच, परीक्षेला अनुत्तीर्ण असलेल्यांची वर्णी प्रतीक्षा यादीत लावण्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नव्हे तर पेसा क्षेत्राची बाबही उमेदवारांपासून दडवून ठेवून, हजारो विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळण्यात आले आहे. गुणवत्ता प्राप्त करूनही हजारो उमेदवारांची निवड यादीत वर्णी लागू शकलेली नाही. त्यामुळे पेसा क्षेत्रातील उमेदवारांबाबत प्रशासन काय निर्णय घेणार हेदेखील गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे निवड यादीविषयी तक्रारी घेऊन गेलेल्या उमेदवारांना लेखी तक्रारी करा म्हणून सल्ला देण्यात येत असून, त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणार म्हणजे काय याविषयीही कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे परीक्षा शुल्क भरून परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेणार्या व गुणवत्ता मिळालेल्या उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. निवड यादी रद्द केली तर त्यासाठ पात्र ठरलेले उमेदवार त्याविरुद्ध न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यातही ज्यांची निवड झाली आहे व गुणवत्ता पात्र असूनही ज्यांना डावलण्यात आले, त्यांना फेर यादीत सामावून घेण्याचा प्रकार म्हणजे निवडीतील गैरप्रकाराची कबुली दिल्यासारखेच होणार आहे. प्रशासन या सार्या प्रकारात चाचपडत असल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.