भूमी अधिग्रहण कायदा रद्द करा काँग्रेस किसान पदयात्रा: मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
By admin | Published: June 29, 2015 12:38 AM2015-06-29T00:38:20+5:302015-06-29T00:38:20+5:30
सोलापूर : केंद्रातील भाजपा सरकारने लागू केलेला भूमी अधिग्रहण कायदा तत्काळ रद्द करा, चिक्की प्रकरण आणि बोगस डीग्री प्रकरणात संबंधित मंत्र्यांकडून राजीनामा घ्या, ही मागणी करीत काँग्रेसने किसान पदयात्रा काढली़
Next
स लापूर : केंद्रातील भाजपा सरकारने लागू केलेला भूमी अधिग्रहण कायदा तत्काळ रद्द करा, चिक्की प्रकरण आणि बोगस डीग्री प्रकरणात संबंधित मंत्र्यांकडून राजीनामा घ्या, ही मागणी करीत काँग्रेसने किसान पदयात्रा काढली़ रविवारी सकाळी १० वाजता शिवाजी चौकातून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन किसाना यात्रेचा शुभारंभ करण्यात आला़ महाराष्ट्राचे निरीक्षक ऋत्विक जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघाली़ या पदयात्रेत आ़ प्रणिती शिंदे, महापौर सुशीला आबुटे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश यलगुलवार उपस्थित होते़ या पदयात्रेत युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल शिंदे, शिवराज म्हेत्रे, पक्षनेते संजय हेमगड्डी, नगरसेवक चेतन नरोटे, बाबा करगुळे, विनोद भोसले, सचिन गुंड, सैपन शेख, सतीश शिंदे, सागर पिसे, राहुल गोयल, गौतम भांडेकर, गणेश डोंगरे, संतोष अेलूर, अशपाक बागवान, सुभाष वाघमारे, हर्षवर्धन कमटम यांच्यासह शहर उत्तर आणि मध्य भागातून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ काँग्रेस भवन येथे या पदयात्रेचा समारोप झाला़ (प्रतिनिधी)