रेल्वे रद्द; आंध्रमध्ये 370 मदत शिबिरे
By admin | Published: October 12, 2014 02:21 AM2014-10-12T02:21:32+5:302014-10-12T02:21:32+5:30
रविवारी दुपारी किना:यावर धडकण्याची शक्यता असलेल्या ‘हुडहुड’ चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करण्याच्या हेतूने ओडिशा सरकारने 39 रेल्वेगाडय़ा व विमानांची दोन उड्डाणो रद्द केली आहेत.
Next
>भुवनेवर : रविवारी दुपारी किना:यावर धडकण्याची शक्यता असलेल्या ‘हुडहुड’ चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करण्याच्या हेतूने ओडिशा सरकारने 39 रेल्वेगाडय़ा व विमानांची दोन उड्डाणो रद्द केली आहेत.
कोरापूट, मलकानगिरी, रायगडा, गजापती, गंजम, कालाहांडी, कंधामाल व नवरंगपुरा या जिल्ह्यांमधील असुरक्षित जागांवरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असल्याची माहिती विशेष मदत आयुक्त पी.के. महापात्र यांनी दिली. आंध्रच्या पाच जिल्ह्यांतील एकूण 436 गावांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असून, येथे 37क् मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. या सर्व जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या 13 पथकांना तैनात केले असून,
केंद्रीय यंत्रणा सज्ज
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत केंद्रीय यंत्रणा चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी पूर्णपणो सज्ज असल्याचे सांगण्यात आले. कॅबिनेट सचिव अजित सेठ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत मदतकार्याच्या तयारीची पाहणी करण्यात आली. कॅबिनेट सचिवांनी दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत चर्चा करून मदतीच्या उपाययोजनांची माहिती घेतली.
राष्ट्रीय आपत्ती मदत दलाची 39 पथके, 168क् मदत जवानांसह व 199 रबरी नावांनिशी तसेच अन्य जीवनरक्षक यंत्रंच्या सोबतीने दोन्ही राज्यातील या आपत्तीला तोंड द्यायला सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)
बोट उलटून मुलगी ठार, मुलगा बेपत्ता
केंद्रपाडा - हुडहुड चक्रीवादळापासून सुरक्षित राखण्याच्या हेतूने नागरिकांना बोटीने सुरक्षितस्थळी नेत असातना बोट उलटून झालेल्या अपघातात मुलगी बुडून ठार झाली तर एक मुलगा बेपत्ता झाला आहे. मगारकांदा गावातील हे नागरिक शनिवारी सकाळी नावेतून जात असताना हा अपघात घडला.