पैसे काढण्यावरील निर्बंध रद्दच करावेत
By admin | Published: January 1, 2017 01:19 AM2017-01-01T01:19:52+5:302017-01-01T01:19:52+5:30
बाद झालेल्या नोटा बँकेत भरण्याची मुदत संपून ५० दिवस झाल्यावरही बँकेतून एका दिवशी साडेचार हजार रुपयेच काढण्याच्या मर्यादेवरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी
नवी दिल्ली : बाद झालेल्या नोटा बँकेत भरण्याची मुदत संपून ५० दिवस झाल्यावरही बँकेतून एका दिवशी साडेचार हजार रुपयेच काढण्याच्या मर्यादेवरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की,‘‘गेल्या ५० दिवसांत उद्धवस्त झाल्यानंतरही पंतप्रधानांवर विश्वास ठेवा. एका आठवड्यात बँकेतून पैसे काढण्यावरील निर्बंध रद्द
झालेच पाहिजेत.’’ आणखी एका टिष्ट्वटमध्ये राहुल गांधींनी मोदी यांचे छायाचित्र टाकून नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीची मोदी यांनी भरपाई केली पाहिजे अशी मागणी केली. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना केंद्र सरकारने २५ हजार रुपयांची भरपाई दिली पाहिजे, असेही गांधी म्हणाले. छोटे दुकानदार व व्यावसायिकांना प्राप्तिकर आणि विक्रीकरामध्ये ५० टक्के सूट दिली जावी, असे ते म्हणाले.
चिदंबरम यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, ३० डिसेंबरपर्यंत संयम ठेवा, असे मोदी म्हणाले होते मग पैसे काढण्यावरील निर्बंध का सुरूच आहेत? दोन जानेवारीपासून सगळ््या एटीएममध्ये पुरेसा पैसा असेल का? येथून पुढे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी काळ््या पैशांत कॅपिटेशन फीची मागणी होणार नाही का? दोन जानेवारीनंतर लाच दिली वा घेतली जाणार नाही का? असा प्रश्नही चिदंबरम यांनी टिष्ट्वटरवर विचारला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)